फोटो सौजन्य - Social Media
बँक ऑफ इंडिया (BOI), एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्केल IV पर्यंतच्या विशेषज्ञ अधिकारी (SO) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार 8 मार्च 2025 ते 23 मार्च 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी पात्रता निकष, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेऊन अर्ज करावा.
बँक ऑफ इंडिया SO भरतीसाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा २५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त 32/35 वर्षे आयु असणारे उमेदवार (पदांनुसार) या भरतीसाठी अर्ज करण्यास निश्चित करण्यात आली आहे. तसेच, शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे. OBC (NCL) उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात आली आहे. PWD (दिव्यांग) उमेदवारांना 10 वर्षे सूट देण्यात आले आहे.
बँक ऑफ इंडिया SO भरतीसाठी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. ऑनलाईन परीक्षेत २५ गुणांची इंग्रजी परीक्षा, १०० गुणांची व्यावसायिक ज्ञान आणि बँकिंग क्षेत्रा संबंधित काही प्रश्न विचारले जातील. तसेच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. एकूण 100 गुणांची मुलाखत घेतली जाईल. अंतिम निवड प्रक्रियेत ऑनलाईन चाचणी आणि मुलाखतीच्या गुणांच्या 80:20 गुणोत्तरानुसार अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी भरतीसंबंधी संपूर्ण अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. परीक्षेच्या तारखा आणि इतर तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी भेट द्यावी. ही संधी बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम आहे.