सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. दूरसंचार विभागाने TES गट ‘B’ अंतर्गत उपविभागीय अभियंता (SDE) पदांसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत. ज्या इच्छुक उमेदवारांना या पदाकरिता अर्ज करायचे आहेत त्यांनी दूरसंचार विभागाच्या अधिकृत वेबसाइट dot.gov.in वर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरुपाची आहे. दूरसंचार विभागाच्या या भरतीतून एकूण ४८ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीप्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर 2024 आहे. या जागा नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता, जम्मू अशा देशातील 13 विविध शहरांमध्ये उपलब्ध आहेत.
दूरसंचार विभागातील विविध शहरांतील जागांची संख्या
शैक्षणिक पात्रता
दूरसंचार विभागातील या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.
उमेदवारासाठीची वयोमर्यादा
दूरसंचार विभाग भरती 2024 साठी अर्ज करण्याचा विचार करत असलेल्या उमेदवारासाठीची कमाल वयोमर्यादा ही 56 वर्षे असावी. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील.
वेतन
दूरसंचार विभागातील या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला न47,600 रुपये ते 1,51,100 रुपये वेतन दिले जाणार आहे.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे निश्चित केली जाईल.
अर्जांचे पुनरावलोकन केल्यानंतर, पात्र उमेदवारांना मुलाखती किंवा इतर मूल्यांकनांसाठी बोलावले जाऊ शकते.
अर्ज करण्याची अंतिम तारीख- 26 डिसेंबर 2024
या भरतीप्रक्रियेच्या नोटीफिकेशनसाठी ‘ इथे‘ क्लिक करा.
दूरसंचार विभागाबद्दल
संचार मंत्रालय अंतर्गत दूरसंचार विभाग (DoT) येतो. या विभागाची स्थापना 1985 साली करण्यात आली. विभागाचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहेत. टेलीग्राफ, टेलिफोन, वायरलेस, डेटा, फॅसिमाईल आणि टेलिमॅटिक सेवांसारख्या संप्रेषण माध्यमांशी संबंधित बाबींचे व्यवस्थापन करते. डीओटी युनिट्स, सार्वजनिक तक्रारी, कायदे, कायदे, नियम, योजना, दूरसंचार धोरण, नेटवर्क स्थिती, आर्थिक डेटा, इंटरनेट सेवा इत्यादींवर माहिती दिली जाते. प्रवेश सेवा, उपग्रह संप्रेषण, पायाभूत सुविधा प्रदाता आणि टेलिमार्केटिंगचे तपशील देखील उपलब्ध आहेत.
सरकारी नोकरीमध्ये राज्यातील मुंबई आणि नागपूर याठिकाणी या भरतीप्रक्रियेमध्ये जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या उपलब्ध संधींचे सोने करुन घेण्याची संधी राज्यातील उमेदवारांना मिळाली आहे. त्यामुळे उमेदवारांनी तात्काळ या करिता अर्ज करावा.