फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनमध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यकाच्या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण २१२ रिक्त जागांना भरण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून या भरतीला सुरुवात करण्यात आले आहे. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना नियुक्तीसाठी काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. या पात्रता निकषांमध्ये शैक्षणिक अटी शर्ती तसेच वयोमर्यादेची संबंधित अटी शर्ती यानाचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरतीच्या प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती:
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या या भरतीमध्ये अधीक्षकांच्या पदासाठी एकूण १४२ जागा रिक्त आहेत. यामध्ये ५९ जागा आरक्षित नाहीत. तर २१ जागा अनुसूचित जाती प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. तसेच १० जागा अनुसूचित जमाती, २८ जागा OBC तर 14 EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. तर ज्युनिअर सहाय्यकाच्या पदासाठी ७० जागा रिक्त आहेत. यातील ५ जागांना अनआरक्षित ठेवले गेले आहे. तर ९ जागांसाठी SC उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर ९ जागा ST प्रवर्गासाठी राखीव आहेत. ३४ जागा OBC प्रवर्गासाठी तर १३ जागा EWS या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
अधीक्षकांच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला काही अटी शर्तीना पात्र व्हावे लागणार आहेत. या पदासाठी अर्ज करता उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यालयातून पदवी असणे अनिवार्य आहे. तसेच संगणकाबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराची टायपिंग गती इंग्रजीत ३५ शब्दे प्रती मिनिटे आणि हिंदी भाषेन ३० शब्दे प्रति मिनिट निश्चित करण्यात आली आहे. ज्युनिअर सहाय्यकाच्या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यालयातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच टायपिंग गती ३५ शब्दे प्रति मिनिटे आणि हिंदी भाषेन ३० शब्दे प्रति मिनिट निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. मुळात, ही रक्कम सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहे. तर OBC आणि EWS या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना देखील ८०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच SC, ST तसेच PEBD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरतीची प्रक्रिया अगदी निशुल्क ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.