फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक खास बातमी आहे. युको बँकेने भरतीचे आयोजन केले आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना अर्ज नोंदवता येणार आहे. स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. युको बँकेमध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. उमेदवारांना युको बँकेच्या ucobank.com या संकेतस्थळावर ही जाऊन या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
युको बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे. उमेदवारांना २७ डिसेंबरपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची मुदत २० जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ६८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्थशास्त्रीच्या पदासाठी २ जागा रिक्त आहेत,अग्नी सुरक्षा अधिकाराच्या पदासाठी २ पदे रिक्त आहेत, सुरक्षा अधिकाराच्या पदासाठी ८ पदे रिक्त आहेत, रिस्क ऑफिसरच्या पदासाठी १० तर IT अधिकाऱ्याच्या पदासाठी २१ जागा रिक्त आहेत. तर चार्टड अकाउंटंटच्या २५ पदांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
अशा प्रकारे भरता येईल अर्ज
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज शुल्काची रक्कम ६०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. SC आणि ST तसेच PWbD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन माध्यमातून जमा केले जाईल. अर्ज करताना उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. एकंदरीत, BE , Btech तसेच CA क्षेत्रात पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या भरतीसाठी किमान आयु मर्यादा २१ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल .