फोटो सौजन्य - Social Media
भारतात लाखो विद्यार्थी दरवर्षी मास्टर ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (MBA)ची तयारी करतात. MBA च्या देशातील टॉप इन्स्टिटूएट मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी कॉमन ऍडमिशन टेस्ट (CAT) च्या परीक्षेची तयारी करावी लागते. दरवर्षी अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रयत्नशील असतात. CAT परीक्षेला क्रॅक करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. देशातील विविध महागड्या CAT कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. त्याचबरोबर विविध महागड्या पुस्तकांचा भांडार खरेदी करतात. या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांचे अनेक पैसे खर्च होतात. शिक्षणासाठी खर्च केलेले पैसे कधीच व्यर्थ होत नाहीत, पण जर आपल्याला तेच शिक्षण त्याच क्वालिटीत कमी खर्चात मिळत असेल तर जास्त खर्च करायचेच कशाला? तसेही महागडे कोचीन क्लासेस आणि ढीगभर महागडी पुस्तके प्रत्येकाला परवडणारी नसतात. चला मग, या लेखातून अशा पुस्तकांविषयी जाणून घेऊया, जे जास्त खर्चिकही नाहीत आणि CAT परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अतिशय फायद्याचे आहे.
CAT मधील गणिताची तयारी करणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. पण नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCART)चे गणिताचे पुस्तक विद्यार्थ्यांच्या अतिशय फायद्याचे ठरते. CAT च्या तयारीसाठी या पुस्तकाला अतिशय महत्वाचे मानले जाते. त्याचबरोबर अरुण शर्मा यांचे ‘how to prepare for quantitative aptitude’ पुस्तक विद्यार्थ्यांना QA च्या अभ्य्सासाठी खूप फायदेशीर ठरते.
हे सुद्धा वाचा : IOCL मध्ये ४०० पदांसाठी जागा रिक्त; तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी
निशित कुमार यांचे ‘logical reasoning and data interpretation’ पुस्तक डेटा इंटरप्रिटेशनसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. या पुस्तकातून विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्यांचे निवारण मिळेल. त्याचबरोबर मीनाक्षी उपाध्याय यांचे ‘Verbal Ability’ नावाचे पुस्तक तसेच मनोहर पांडे यांचे ‘General Knowledge 2024’ पुस्तक विद्यार्थ्यांच्या करंट अफेर्सच्या ज्ञानात भर टाकते. वरील पुस्तक अभ्यासलाने विद्यार्थी CAT च्या परीक्षेसाठी परिपक्व होतो. पण इच्छशक्ती असणे फार महत्वाचे असते. CAT EXAM 2024 नोव्हेंबरच्या २४ तारखेला आयोजित करण्यात येईल.