(फोटो सौजन्य: Pinterest)
अखेर सुरू झाला आहे सुरजकुंड मेळावा, एन्ट्री तिकीट आणि पूर्ण डिटेल्स जाणून घ्या
मुंबईतच गुलाबी फुलांचा स्वर्ग
धावपळीच्या मायानगरी मुंबईतही एक असा परिसर आहे, जिथे काही काळासाठी शहराचं गडबडलेलं आयुष्य थांबल्यासारखं वाटतं. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील विक्रोली ते घाटकोपर दरम्यानचा भाग सध्या “मुंबईचा चेरी ब्लॉसम स्पॉट” म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. इथे रस्त्यांच्या दुतर्फा गुलाबी फुलांनी भरलेली झाडं दिसतात आणि संपूर्ण परिसर एखाद्या चित्रासारखा भासतो.
हे चेरी ब्लॉसम नाहीत, पण नजारा तितकाच सुंदर
मुंबईचं उष्ण आणि दमट हवामान पारंपरिक चेरी ब्लॉसमसाठी योग्य मानलं जात नाही. तरीही इथे खास प्रकारची झाडं छान वाढलेली दिसतात. विक्रोली–घाटकोपर दरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दिसणारी ही गुलाबी फुलांची झाडं म्हणजे Tabebuia Heterophylla, ज्यांना पिंक ट्रंपेट ट्री असंही म्हणतात. ही झाडं जरी जपानी चेरी ब्लॉसमपेक्षा वेगळी असली, तरी फुलांच्या बहरात त्यांचा देखावा एखाद्या स्वप्नासारखा वाटतो.
विक्रोलीचा गुलाबी हायवे का आहे खास
दरवर्षी काही आठवड्यांसाठी हा संपूर्ण स्ट्रेच गुलाबी रंगात न्हाऊन निघतो. झाडांवर गुलाबी फुलांचे घोस लागतात, फुलं रस्त्यावर झरतात आणि जमिनीवर जणू गुलाबी चादर पसरल्यासारखं दृश्य तयार होतं. याच अनोख्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर या ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत.
इंस्टाग्रामवर शेअर झालेल्या अनेक व्हिडीओंमध्ये स्पष्टपणे नमूद केलं जातं की ही फुलं पिंक टॅबेबिया आहेत आणि ठिकाण आहे विक्रोली-घाटकोपर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. काही लोकांनी या परिसराच्या सौंदर्याचं कौतुक केलं, तर काहींनी प्रदूषणामुळे नजारा थोडा बिघडतोय अशी खंत व्यक्त केली. अनेक स्थानिक लोक सांगतात की ते वर्षानुवर्षे इथे फिरायला येतात, पण आता ड्रोन शॉट्समुळे ही जागा अजूनच प्रसिद्ध झाली आहे.
विक्रोली पिंक ब्लॉसम स्पॉटला कसं जायचं
इथे जाण्यासाठी कोणतेही तिकीट नाही. गुलाबी फुलांचा आनंद घेण्यासाठी इथे कोणतंही तिकीट नाही. मात्र हा भाग वाहतुकीसाठी आणि जॉगिंगसाठी वापरला जातो, त्यामुळे भेट देताना जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे.
सोशल मीडिया गर्दी आणि सिविक सेन्स
या जागेचं सौंदर्य जितकं चर्चेत आहे, तितकंच काही लोकांचं वागणं चिंतेचा विषय ठरत आहे. काही जण फुलांच्या फांद्या तोडताना दिसतात, काही फक्त रील्स बनवण्यात गुंतलेले असतात आणि त्यामुळे फुटपाथ अडवले जातात. यामुळे मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग करणाऱ्यांना त्रास होतो. झाडांचं नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येकानं थोडं भान ठेवणं गरजेचं आहे.
मुंबईतील इतर गुलाबी फुलांचे स्पॉट
विक्रोलीशिवाय मुंबईत आणखीही काही ठिकाणी पिंक ट्रंपेट ट्री पाहायला मिळतात. त्यामध्ये:
जगातील असा एक देश जिथे गरुडासाठी बनवलं जात पासपोर्ट, अनोखं आहे यामागच कारण…
गुलाबी नजारा पाहण्यासाठी योग्य वेळ
या झाडांना साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत फुलं येतात. सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेस प्रकाश सौम्य असताना हा परिसर अधिकच सुंदर दिसतो. थोडक्यात सांगायचं तर, जपानच्या चेरी ब्लॉसमची आठवण करून देणारा गुलाबी अनुभव मुंबईतच घ्यायचा असेल, तर विक्रोली-घाटकोपरचा हा हायवे नक्कीच भेट देण्यासारखा आहे, फक्त निसर्गाचा आदर राखायला विसरू नका.






