फोटो सौजन्य - Social Media
तुम्ही सरकारी क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी शोधत आहात, परंतु अर्धवट राहिलेल्या शिक्षणाने नोकरी शोधणे कठीण झाले आहे, तर आता निश्चिंत रहा. कारण ही बातमी तुमच्या तणावाला दूर करून, तुम्हाला तणावमुक्त करणार आहे. सरकारी क्षेत्रामध्ये एक विशेष भरती निघाली आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीला आजपासून सुरुवात झाली आहे. पर्यटन विभागामधील ही भरती असून १०वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम भरतीची संधी आहे. जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचे आहे तर ताबडतोब तयारीला लागा. कारण, या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून उमेदवारांना २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर त्या अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा : हेंकेल इंडियाकडून ठाण्यातील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये उभारले स्पेस ऑब्जर्वेशन सेंटर!
या भरती संदर्भात विशेष गोष्ट अशी आहे कि इतर भरती प्रक्रियेसारखे या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनकडून कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारण्यात येणार नाही आहे. उमेदवार निशुल्क अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही अटी शर्तीची पात्रता करावी लागणार आहे. या अटी शर्तींना पात्र उमेदवारालाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या अटी उमेदवाराच्या वयोमायदेविषयक आहे तसेच शैक्षणिक आहेत.
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आहे. तर जास्तीत जास्त ३२ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. महत्वाची बाब अशी आहे कि आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराला वयोमर्यादेमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येईल. अर्ज कर्त्या उमेदवाराला काही शैक्षणिक अटीला सामोरे जावे लागणार आहे. दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान दहावी उत्तीर्ण शिक्षण असणे अनिवार्य आहे.
हे देखील वाचा : MBA करावे की PGDM, कोणता अभ्यासक्रम ठरु शकतो तुमच्यासाठी महत्वाचा? जाणून घ्या
या अर्ज प्रक्रियेनंतर उमेदवारांची निवड प्रक्रियेला सुरुवात होईल. यामध्ये उमेदवारांची लिखित परीक्षा तसेच टायपिंग स्पीड टेस्ट घेण्यात येईल, यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा, जेणेकरून या भरतीच्या संदर्भात सखोल माहिती अभ्यासता येईल आणि या भरती प्रक्रियेस खोलवर जाणता येईल.