फोटो सौजन्य - Social Media
संगीत क्षेत्रे विशाल आहे. यात पैसा आहे, प्रसिद्धी आहे आणि नाव आहे. मुळात, संगीतामध्ये रस ठेवणारेही अनेक आहेत. संगीत प्रेमी खूप असले तरी संगीतात करिअर घडवण्यासाठी प्रत्येकजण तयार नाही. कारण संगीतामध्ये Fixed Income नाही. हे काम स्टेबल नाही, परंतु जर यामध्ये प्रसिद्धी मिळाली तर आपला हात कुणीही धरू शकत नाही. यश स्वतः आपल्या जवळ यायला सुरुवात करतो. संगीतामध्ये फक्त गायक नाही तर Music डिरेक्टर, Lyricist तसेच Sound Engineer सारखे अनेक पदावर काम करता येते. त्यातील सगळ्यात महत्वाचा पद म्हणजे Composer. जर तुम्ही गाण्याला चाल आणि लय देण्यात रस ठेवता तर सॉंग कम्पोजर बनणे अधिक सोयीस्कर बनेल.
सॉंग कम्पोजर बनण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे महत्वाचे आहेत. मुळात, गाण्याचा स्ट्रक्चर, स्केल, राग, ताल, लय, आणि वाद्यसंगती यांचं प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे. याशिवाय कंपोजिंग करणे जवळजवळ अशक्यच! संगीताचे शिक्षण घ्या. शास्त्रीय संगीत, वेस्टर्न म्युझिक, म्युझिक प्रॉडक्शन यासारखे कोर्सेस केल्यास फाउंडेशन मजबूत होतं. मुळात, विद्यार्थ्याला FL Studio, Logic Pro, Ableton Live यांसारख्या DAW सॉफ्टवेअरचा सराव असावा. येथे संगीत तयार केले जाते तसेच गीत संगीतबद्ध केले जाते.,
स्वतःची कॉम्पोजिशन्स रेकॉर्ड करून सोशल मीडियावर किंवा म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर अपलोड करा. तसेच नेटवर्किंगवर भर द्या. या क्षेत्रात ओळख असणे फार गरजेचे आहे. गायक, गीतकार, प्रोड्युसर्स यांच्याशी संपर्क ठेवा. ओपन माईक्स, फेस्ट्समध्ये भाग घ्या. करिअरच्या सुरुवातीला संघर्ष, अपयश, आणि नाकारले जाणं हे सामान्य आहे, पण सातत्य, मेहनत, आणि नाविन्यपूर्णता याच्या जोरावर तुम्ही या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करू शकता. लहान-मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करून अनुभव घेणं आणि त्यातून शिकणं हेसुद्धा महत्त्वाचं आहे.
थोडक्यात सांगायचं झालं, तर सॉंग कंपोजर म्हणून यशस्वी करिअर घडवण्यासाठी तुमचं संगीतावर प्रेम, तांत्रिक कौशल्य, सतत सराव, आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची तयारी असणं गरजेचं आहे. संधी मिळण्याची वाट पाहू नका, स्वतः संधी निर्माण करा.