फोटो सौजन्य - Social Media
प्रोफेशनल ट्रॅव्हल Blogger/ Vlogger
ही कदाचित जगातील सर्वात मजेदार नोकरी मानली जाते. ट्रॅव्हल ब्लॉगर किंवा व्लॉगरचं काम म्हणजे भारतातील सुंदर स्थळांना भेट देणे, त्यांच्या कथा, संस्कृती आणि अनुभव व्हिडिओ किंवा ब्लॉगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे.
बियर किंवा वाईन टेस्ट करणे
कल्पना करा, तुमचं काम म्हणजे वेगवेगळ्या पेयांची चव घेणे आणि त्यांच्या क्वालिटीचं मूल्यांकन करणे! वाइन किंवा व्हिस्की टेस्टर मोठ्या हॉटेल्स, बार्स किंवा ड्रिंक्स कंपन्यांसाठी काम करतात. विविध पेयांचं फ्लेवर टेस्टिंग, गुणवत्ता आणि सुगंधाचं विश्लेषण, ग्राहकांना कोणती पेय निवडावी याबाबत सल्ला देणे ही कामे!
Video Game टेस्टर
गेम खेळायला आवडतं? मग ही तुमची Dream Job! कोणताही गेम लॉन्च होण्याआधी त्याची टेस्टिंग होते आणि हे काम करतात, गेम टेस्टर्स. हे काम तंत्रज्ञान + गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठीचं स्वर्ग आहे.
Adventure Tour गाईड
जंगल, नद्या, पर्वत आणि साहसी प्रवास आवडतात? मग Adventure Tour Guide बनणं उत्तम. ट्रेकिंग, राफ्टिंग, माउंटेन क्लायम्बिंगसाठी ग्रुप्सला गाइड करण्याचे काम येणे आवश्यक आहे. या क्षेत्रात ऑफिसची चार भिंत नसते, काम म्हणजेच ‘अॅडव्हेंचर’.
प्रोफेशनल पेट सीटर/ डॉग वॉकर
जर तुम्ही प्राण्यांवर प्रेम करत असाल तर ही नोकरी तुमच्यासाठी सर्वात सुखदायक! महानगरात या सेवेला मोठी डिमांड आहे आणि कमाईही चांगली आहे.






