राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर (फोटो- सोशल मीडिया)
पिंपरी चिंचवडमध्ये वाढतेय लोकसंख्या आणि उद्योग
अतिरिक्त उपकेंद्रे, रोहित्रे क्षमता वृद्धीची कामे प्रगतीपथावर
ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विधानसभेत माहिती
मुंबई: पिंपरी चिंचवडमध्ये वाढत चालले उद्योग, लघुउद्योग त्याचप्रमाणे वाढते शहरीकरण,लोकसंख्या लक्षात घेऊन आवश्यक वीज पुरवठा सुरळीत प्रमाणात उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून अतिरिक्त उपकेंद्रे, रोहित्रे क्षमता वृद्धीची कामे प्रगतीपथावर असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत सांगितले. पिंपरी चिंचवड मधील औद्योगिक आणि निवासी पट्ट्यातील वीज सेवा संदर्भात सदस्य महेश लांडगे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डीकर बोलत होत्या.
राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, आवश्यक वीज पुरवठा सुरळितपणे उपलब्ध करुन देण्यासाठीची कामे प्रगतीपथावर आहे. संबंधित भागात महापारेषण कंपनीकडून सक्षमीकरणाची विविध कामे प्रगतीपथावर असून, भविष्यातील महावितरणची वाढीव वीज मागणी लक्षात घेऊन प्रस्तावित उपकेंद्रे व क्षमतावाढीची कामे करण्यात येत आहेत. निधीअभावी महापारेषणचे कोणतेही काम प्रलंबित नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय; भव्य ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
महावितरण कंपनीच्या गणेशखिंड शहर मंडळअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी गावठाण, चऱ्होली, मोशी, तळवडे, चिखली व अन्य भागात औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी वीज ग्राहकांना महापारेषणची अतिउच्चदाब भोसरी आर एस-१ (स्थापित क्षमता २७५ एम.व्ही.ए. मागणी १९९ एम.व्ही.ए.), भोसरी आर एस-२ (स्थापित क्षमता १५० एम.व्ही.ए. उच्चतम मागणी १०९ एम.व्ही.ए.), टेल्को (स्थापित क्षमता १५० एम.व्ही.ए. उच्चतम मागणी १२९ एम.व्ही.ए.) व चिंचवड आर एस (स्थापित क्षमता २३० एम.व्ही.ए. उच्चतम मागणी १९० एम.व्ही.ए.) अशा एकूण चार २२० के.व्ही. उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो.
भोसरी विभागात महावितरणची २२/२२ के.व्ही. ची १४ उपकेंद्र आणि २२/११ के.व्ही. ची दोन उपकेंद्र आहेत. या सर्व उपकेंद्रातून ११० उच्चदाब वीज वाहिन्यांद्वारे भोसरी विभागाला वीजपुरवठा करण्यात येतो. सदर विभागाअंतर्गत एकूण चार उपविभागीय कार्यालय आणि १७ शाखा कार्यालय आहेत. तसेच या विभागात एकूण ४५३८२० ग्राहक असून, त्यापैकी ५८० उच्चदाब ग्राहक आहेत. उपरोक्त चार अतिउच्चदाब उपकेंद्राची एकूण स्थापित क्षमता ८०५ एम.व्ही.ए. असून, मागणी ६२७ एम.व्ही.ए. आाहे. त्याद्वारे पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, गावठाण, चहोली, मोशी, तळवडे, चिखली या सर्व बागात अखंडीत वीजपुरवठा केला जातो.
रत्नागिरी परिमंडलात २५ कोटी ९१ लाखांची थकबाकी; दोन महिन्यांत १ हजार १८२ ग्राहकांचा…
भोसरी मतदारसंघांमध्ये वाढत्या वीज ग्राहकसंख्येचा तसेच भविष्यातील वीज मागणीचा विचार करता वीज वितरण यंत्रणा सक्षम व बळकट करण्यासाठी महापारेषण कंपनीतर्फे भोसरी येथील सेंचुरी एन्का अतिउच्चदाब केंद्रामध्ये ५० एम.व्ही.ए. ची दोन उच्चदाब रोहित्रे बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच, २२० के. व्ही. टेल्को उपकेंद्राची क्षमता वाढवण्याचे नियोजन २०२७-२८ वर्षाच्या त्याचप्रमाणे, मोशी सफारी पार्क आणि प्राईड वर्ल्ड सिटी, चहोली येथे नवीन २२०/३३/२२ के.व्ही., २०० एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्याचे नियोजन २०२९-३० वर्षाच्या (एसटीयू प्लॅन) आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे.






