• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Iit Mumbais Project Outreach Pilot Project Begins

IIT मुंबईचा ‘प्रोजेक्ट आऊटरीच’ पायलट प्रोजेक्ट सुरू! अनेक सोयी-सुविधांचे लाभ लक्षात घेऊन, उभारली जातेय लॅब

आयआयटी मुंबई आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आऊटरीच’ पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून पाणी-ऊर्जा क्षेत्रातील शाश्वत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष मॉडेल म्हणून लिविंग लॅब उभारली जात आह

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 26, 2025 | 03:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • स्मारक परिसरात स्वच्छ ऊर्जा वापर वाढेल
  • ऊर्जेचा खर्च कमी होईल
  • हँड वॉश स्टेशन उभारण्यात आले
आयआयटी मुंबई आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आऊटरीच’ या महत्त्वपूर्ण पायलट प्रोजेक्टची अंमलबजावणी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक परिसरात सुरू झाली आहे. पाणी आणि ऊर्जा यांसारख्या मूलभूत क्षेत्रांमध्ये शाश्वत विकास साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करता येईल, याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरणार आहे. ग्रामीण भागात तांत्रिक उपायांचा वापर करून सोपी, टिकाऊ आणि किफायतशीर साधने उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. या संकल्पनेत ‘लिविंग लॅब’ या नावाने एक विशेष अध्यापन-प्रशोधन केंद्र उभारले जात असून याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि स्थानिकांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळणार आहे. शाश्वत तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, माहिती आदानप्रदान, नव्या कल्पनांची देवाणघेवाण आणि तांत्रिक सुधारणा यांना लिविंग लॅबमुळे चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाची लाइटनिंग स्कॉलर्स फेलोशिप! आंतरराष्ट्रीय संसाधनांचा लाभ

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे फेज 1 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण व्यवस्था बसवण्यात आल्या आहेत. यामध्ये 4 किलोवॅट क्षमतेची सोलर नेट-मीटरिंग प्रणाली बसवण्यात आली असून ती संपूर्णपणे ग्रिड कनेक्टेड आहे. यामुळे स्मारक परिसरात स्वच्छ ऊर्जा वापर वाढेल आणि ऊर्जेचा खर्च कमी होईल. याशिवाय पाणी बचतीसाठी विशेष प्रकारचे हँड वॉश स्टेशन उभारण्यात आले आहे, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर कमी होईल. ग्रामीण भागात अत्यंत उपयोगी ठरणारा, वीज न लागणारा सब्जी कूलर बसवण्यात आला आहे, ज्यामुळे भाज्या-फळे जास्त काळ ताजी राहू शकतात. तसेच पिण्याच्या पाण्यातील गुणवत्तेचा प्रश्न लक्षात घेऊन गुरुत्वाकर्षण-आधारित अल्ट्राफिल्ट्रेशन व्यवस्था बसवण्यात आली आहे. ही प्रणाली वीजाशिवाय चालते आणि पाण्याचे सुरक्षित शुद्धीकरण करते. या सर्व तंत्रज्ञानांची अंमलबजावणी आता पूर्ण झाली असून फेज 1 चे औपचारिक हस्तांतरण आयआयटी बॉम्बेकडून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टकडे करण्यात येणार आहे.

जॉब ALERT : सरकारी व बँकिंग क्षेत्रातील मोठ्या भरत्या सुरू, पाच हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज करा

या हस्तांतरण समारंभाचे आयोजन २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, ता. माणगाव, जि. रायगड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आयआयटी मुंबईच्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सोल्यूशन्स सेल आणि उन्नत महाराष्ट्र अभियानाशी संलग्न प्रकल्प प्रमुख राजाराम देसाई हे उपस्थित राहणार आहेत. ते शाश्वत ऊर्जा, ग्रामीण विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे परस्परसंबंध यावर सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रामीण विकासात काम करणारे कार्यकर्ते, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्य आणि विविध सरकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विकासाला तांत्रिक आणि शाश्वत दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञानवृद्धीसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्राकडून करण्यात आले आहे.

Web Title: Iit mumbais project outreach pilot project begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Bombay IIT
  • IIT Bombay

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

Mar 03, 2026 | 05:30 AM
Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Mar 03, 2026 | 05:25 AM
Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

Mar 03, 2026 | 02:35 AM
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे जग होणार रक्तरंजित; त्यांच्या हत्येमुळे इराणचा स्वाभिमानाला तडा

Mar 03, 2026 | 01:15 AM
15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

Mar 03, 2026 | 12:30 AM
Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Mar 02, 2026 | 11:23 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.