फोटो सौजन्य - Social Media
देशात आधीसारखे वातावरण आता राहिले नसून देशातील समाजव्यवस्था आता पुढारली असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुलींना उच्च शिक्षण, कोचिंग, आणि स्पर्धा परीक्षेची साधने उपलब्ध करून देणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली आहे. ज्या देशात आधी मुलीना शिक्षण दिले जात नव्हते आता त्याच देशात मुलीच्या शिक्षणाला कुटुंब पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकंदरीत, समाजातील दृष्टिकोन बदलत असून मुलींना आता देशातील सर्वात कठीण परीक्षा देण्यासाठी पाठिंबा मिळतो आहे.
महिला आता पुढारल्या आहेत. नेतृत्व करत आहेत. अधिक महिला आता धोरणनिर्मिती (Policy Making) प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावत आहेत. तर यशस्वी महिला IAS/IPS अधिकारी पुढील पिढीच्या मुलींसाठी प्रेरणादायी आदर्श बनत आहेत. UPSC मध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अभियांत्रिकी क्षेत्राकडून वळत आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना UPSC परीक्षेत एक भलताच रस आहे. यामागे नक्कीच काही कारणे असतील त्यामध्ये देशात इंजिनिअरिंग कॉलेजची जास्त संख्या असणे तसेच स्पर्धा परीक्षेची लवकर सुरू होणारी तयारी आणि उत्कृष्ट प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स यांचा समावेश आहे.
त्यानंतर ह्युमॅनिटीज आणि सायन्स पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांचा क्रमांक येतो. त्यांनाही UPSC क्षेत्रात विशेष रस दिसून येतो. महिला सहभाग वाढला असला, तरी एकूण निवडीत पुरुष उमेदवारांची संख्या अजूनही जास्त आहे. परीक्षेला बसणाऱ्या पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. तरीदेखील महिलांची तयारी, चिकाटी आणि आत्मविश्वास वर्षागणिक वाढताना दिसतो आहे.






