Indian Highways Management Company Recruitment for Engineer Finance Officer Posts 2024
तुम्ही जर सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता (आयटीएस), अधिकारी (वित्त) पदांच्या एकूण 31 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
रिक्त असलेले पद
1. अभियंता (आयटीएस)
2. अधिकारी (वित्त)
एकूण रिक्त पद संख्या : 31 पदे
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
हेही वाचा : पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये ‘या’ पदासाठी मोठी भरती!
भरतीचा तपशील
– अभियंता (आयटीएस) : 30 जागा रिक्त
अधिकारी (वित्त) : 01 जागा रिक्त
किती मिळणार पगार?
– अभियंता (आयटीएस) : 40,000 ते 1,40,000 रुपये प्रति महिना
– अधिकारी (वित्त) : 40,000 ते 1,40,000 रुपये प्रति महिना
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
– अभियंता (आयटीएस) : Bachelor’s Degree of Engineering
– अधिकारी (वित्त) : Chartered Accountants (CA)
कसा कराल अर्ज?
इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनीत अभियंता (आयटीएस), अधिकारी (वित्त) पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 असणार आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा : https://ihmcl.co.in/wp-content/uploads/2024/07/Final-Advertisement_02.07.2024-With-annexures.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://recruitment.ihmcl.co.in/panel/login.php
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://ihmcl.co.in/ ला भेट द्या.