फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथी खूप पवित्र मानली जाते आणि त्याचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये विशेष आणि महत्वपूर्ण स्थितीचा समावेश आहे ती म्हणजे पौर्णिमा तिथी. वर्षभरात 12 पौर्णिमा येतात. सर्व पौर्णिमेला आपापले असे महत्त्व आहे. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असे म्हटले जाते. यावेळी स्नान आणि दान करण्याची देखील परंपरा आहे. पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे जाणून घ्या
पौष पोर्णिमा तिथीची सुरुवात 2 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 3 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 32 मिनिटांनी होणार आहे. यावेळी पौर्णिमा तिथी 3 जानेवारी रोजी साजरी केली जाईल.
सर्वांत प्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून गंगा नदीत किंवा घरी गंगेच्या पाण्याने स्नान करा. स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा आणि प्रार्थना करा. तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल फुले आणि रोली घाला आणि सूर्य देवाची प्रार्थना करा. त्यानंतर चौरंगावर पिवळ्या रंगांचे वस्त्र पसरवा. तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा.
पूजा करतेवेळी पिवळी फुले, तुळशीची पाने, चंदनाचा लेप, संपूर्ण धान्य, धूप, दिवे, अन्न आणि कपडे अर्पण करा. त्यानंतर, विष्णूच्या सहस्र नावांचा जप करा आणि तुळशीच्या माळेने “ॐ नमो भगवते वासुदेवाय” मंत्राचा जप करा. पूजेनंतर तुपाचा दिवा लावून आरती करा आणि नैवेद्य दाखवा.
पौर्णिमेच्या दिवशी गहू, तांदूळ, डाळ किंवा इतर कोणत्याही अन्नधान्यांचे दान करू शकता. अन्नधान्य चिंतन महादान मानले जाते. यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते. अन्नधान्याचे दान केल्याने दारिद्र्य दूर होते.
पौष पौर्णिमेच्या दिवशी गरिब आणि गरजूवंतांना उंटर कपडे चादर किंवा इतर वस्तूंचे दान करावे. वस्त्रांचे दान केल्याने सुख-समृद्धी घरामध्ये येते आणि मान सन्मांनामध्ये वाढ होते.
पौष पौर्णिमेच्या दिवशी काळे तीळ आणि गुळाचे दान करावे. याचे दान केल्याने सूर्य आणि शनिदेव प्रसन्न होतात. तिळाचे दान केल्याने शनिदोष दूर होतो आणि गुळाचे दान केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात.
पौष पौर्णिमेच्या दिवशी तूप आणि गोड वस्तूंचे दान करावे. या दिवशी तूप आणि मिठाईचे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच घरामध्ये धन वैभव येते.
पौष पौर्णिमेच्या दिवशी गहू दान करावे. जर हे जमत नसेल तर गायशी संबंधित वस्तू दूध, दही याचे दान करावे. त्यामुळे देवी देवता प्रसन्न होते.
पौष पौर्णिमेच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार एखाद्या मंदिरात ब्राह्मण किंवा गरजूवंतांना धनाचे दान करावे. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पौष पौर्णिमेला केलेले दान धन, समृद्धी आणि मानसिक शांती देते. या दिवशी दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद आणि लक्ष्मी कृपा मिळते, अशी श्रद्धा आहे.
Ans: अन्नधान्य, तांदूळ, गहू, दूध, तूप, तीळ, पांढरे कपडे, चांदी आणि गरजूंना उबदार वस्त्रे दान करणे शुभ मानले जाते.
Ans: ब्राह्मण, गरजू व्यक्ती, वृद्ध, साधू-संत किंवा गरीबांना श्रद्धेने दान करावे.






