फोटो सौजन्य - Social Media
भारतीय नौदलाने वैद्यकीय विभागामध्ये भरतीला सुरुवात केली होती. या भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी सहभाग नोंदवला होता. वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेले परंतु भारतीय नौदलामध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या उमेदवारांनासाठी ही सुवर्ण संधी होती. या भरतीच्या यामाध्यमातून अशा उमेदवारांना भारतीय नसेनेमध्ये रुजू होण्याची संधी मिळाली होती. या भरतीसाठी उमेदवारांनी ७ सप्टेंबर २०२४ तारखेपासून अर्ज नोंदवण्यास सुरुवात केली होती. उमेदवारांना दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करण्याचे निर्देश भारतीय नौसेनेने जाहीर केले होते. सप्टेंबरच्या १७ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती.
हे देखील वाचा : मेट्रोपॉलिसतर्फे सुरु करण्यात फेलोशीप कोर्सेस, डी.वाय. पाटील विद्यापीठाशी केली भागीदारी
अर्ज कर्त्या उमेदवारांची निवड प्रक्रिये द्वारे नियुक्ती करण्यात येणार आहे. १० ऑक्टोबर २०२४ रोजी लिखित परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी अर्ज कर्त्या उमेदवारांना परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. या परीक्षेत पात्र उमेदवारांना नियुक्तीची संधी मिळणार आहे, त्यामुळे या परीक्षेची जोमाने तयारी करण्याचे आवाहन भारतीय नौदलाने दिले आहेत. मुळात, या भरतीसाठी इतर भरतींप्रमाणे अर्ज शुल्क आकारण्यात आले नाही. सर्व प्रवगातील उमेदवारांसाठी हि भरती प्रकिया निशुल्क होती. या भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या अटी आणि शर्तींना पात्र उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. या अटी शर्ती मुळात शैक्षणिक आणि वयोमर्यादेसंदर्भात होत्या.
SSR मेडिकल असिस्टंटच्या जागेसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २१ वर्षे तर किमान वयोमर्यादा १८ वर्षे निश्चित करण्यात आली होती. तसेच अर्जकर्ता उमेदवार Physics, Chem, Biology (PCB) या विषयांमध्ये किमान ५०% गुणांनी HSC उत्तीर्ण हवा. या अटींना पात्र उमेदवारच या अर्ज प्रक्रियेत सहभाग घेण्यास पात्र होता. लवकरच, या भरतीसाठी आयोजित असलेल्या लिखित परीक्षेला सुरुवात होणार आहे.
हे देखील वाचा : नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन; शैक्षणिक क्षेत्रात शोककळा
लिखित परीक्षा १० ऑक्टोबरला होणार असून उमेदवारांचे प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र पाहता येणार आहे, तसेच त्यांना त्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र ओनलाईन डाउनलोड करता येणार आहे. प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी भारतीय नौसेनेच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट दयावी. लक्षात असू द्या कि, परीक्षेसाठी येत असताना उमेदवारांनी प्रवेश पत्राची एक प्रत सोबत आणावी.