लैंगिक संबंधाबाबत माहिती शेअर करणे आवश्यक
निरोगी असणे हे एकंदर आरोग्याशी संबंधित आहे आणि लैंगिक आरोग्य हा त्याचा अविभाज्य भाग आहे. याबाबत चर्चा करताना लाजायची अजिबात गरज नाही. कारण शारीरिक संबंध ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. एका ठराविक वयानंतर अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणेच शारीरिक संबंधांचीही गरज भासते. तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या नात्यासाठी लैंगिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबात आम्ही आज तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.
लिंग, लैंगिक आरोग्य आणि लैंगिक आनंद हे अगदी निषिद्ध विषय आहेत. विशेषत: जेव्हा स्त्रियांचा प्रश्न येतो. मात्र गेल्या काही वर्षांत इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे या संवेदनशील विषयाच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. त्यामुळे तुमच्या लैंगिक आरोग्याशी संबंधित काही गोष्टी तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे आहे. वैशाली शर्मा, एमडी (एम्स) DSAGE (जर्मनी) वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, लॅपरोस्कोपिक सर्जन आणि वंध्यत्व विशेषज्ज्ञ यांच्या मते, लैंगिक आरोग्याला कमी लेखले जाते, त्यांनी याबाबात काही महत्त्वाची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
दुर्लक्ष करू नका
डॉ. शर्मा यांनी सांगितले की, “तुमच्या शरीराच्या प्रायव्हेट भागावरील नवीन तीळ, व्रण किंवा जखमांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये त्वचेची कोणतीही विकृती आढळल्यास, त्वचारोगतज्ज्ञांना भेट देण्याचा सल्ला दिला जातो. याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. कारण याचा संबंध लैंगिक संबंधाशी प्रकर्षाने येतो. यामुळे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमीही होऊ शकते. विशेषतः महिला या गोष्टीकडे अधिक दुर्लक्ष करताना दिसतात
हेदेखील वाचा – वयानुसार दर महिन्यात किती वेळा ठेवावे शारीरिक संबंध? धक्कादायक आकडे अहवालातून समोर
स्वच्छता ठेवा
Pubic Hair ठेवायचे की नाही हा प्रत्येक स्त्रीचा निर्णय असतो, परंतु डॉक्टर स्वच्छतेच्या कारणास्तव ते काढून टाकण्याची नेहमी शिफारस करतात. डॉ. शर्मा सुचवतात की महिलांनी शक्यतो प्रायव्हेट पार्टजवळच्या भागाजवळ रेझर किंवा ब्लेड वापरणे टाळावे कारण त्वचा अत्यंत संवेदनशील असते आणि ते करताना ही त्वचा कापण्याची आणि जखम होण्याची शक्यता असते. यामुळे आणखी संसर्ग होऊ शकतो, तसेच, योनीमार्ग स्वच्छ ठेवणे चांगले ठरते. स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे.
हेल्दी आणि सुरक्षित संभोगाबाबत माहिती
सुरक्षित संबंधांची काळजी घ्या
डॉ शर्मा यांनी पुढे सांगितले की, जोपर्यंत परस्पर संमतीने केले जाते तोपर्यंत शारीरिक संबंध ही एक निरोगी प्रक्रिया आहे. “तुम्ही किती वेळा शारीरिक संबंध ठेवताय याला कोणतीही सामान्य मर्यादा नाही. एका जोडप्यासाठी महिन्यातून एकदा लैंगिक संबंध ठेवणे हे सामान्य असू शकते, तर दिवसातून एकदा करणेदेखील पूर्णपणे सामान्य आहे. हे दोन्ही जोडीदारांच्या कामवासनेवर अवलंबून असते. ही चर्चा दोघांनीही मनमोकळेपणाने करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुम्ही किंवा तुमचा पार्टनर शारीरिक संबंधादरम्यान व्यवस्थित सुरक्षा अर्थात कंडोम वापरत असल्याची खात्री करा. हे केवळ गर्भधारणा टाळण्यासाठीच नाही तर कोणत्याही संभाव्य लैंगिक संक्रमित रोगांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी आहे. तसेच, ज्या जोडीदाराच्या लैंगिक किंवा आरोग्याच्या इतिहासाबद्दल तुम्हाला माहिती नाही अशा जोडीदाराशी लैंगिक संबंध टाळा.
कामोत्तेजना म्हणजे नक्की काय जाणून घ्या
डॉ. शर्मा म्हणतात, “पुरुषांना कामोत्तेजनाचा अर्थात Orgasm चा अनुभव घेणे सोपे आहे, परंतु महिलांसाठी ते इतके सोपे नाही. बऱ्याच स्त्रियांसाठी, हे तणावाचे कारणदेखील असू शकते. फोरप्ले आणि उत्तेजित करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करून पाहा. तुम्हाला यामध्ये नेमके कधी समाधान मिळतेय आणि कधी अनुभव येतोय हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय आपल्या जोडीदाराशी याबाबत चर्चा करा.
योनीस्राव
स्त्रीसाठी, विशेषतः, योनीतून स्त्राव कधी होतोय हे जाणून घेणे लैंगिक आरोग्य राखण्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. स्त्राव येणे हेदेखील खरंतर त्यांच्या ओव्हुलेशन सायकलचे लक्षण आहे. त्यामुळे याबाबत योग्य माहिती असायला हवी. तुम्हाला कळत नसेल तर योग्यवेळी डॉक्टरांशी सल्लामसलत करा आणि जाणून घ्या
हेदेखील वाचा – सकाळीच शारीरिक संबंध ठेवाल तर मिळतील कमालीचे फायदे, रिसर्चमध्ये खुलासा
व्यायाम करणे
नियमित व्यायाम करा
व्यायाम करणे म्हणजे फक्त स्लिमट्रिम किंवा फिट राहणे नाही. तुमच्या लैंगिक आरोग्यामध्ये सामर्थ्य, लवचिकता आणि तग धरण्याची अर्थात Stamina असण्याची गरजदेखील समाविष्ट आहे. हे लैंगिक आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायामासह येऊ शकते. ज्या स्त्रियांची योनी वयानुसार सैलसर होते त्यांच्यासाठी नेहमीच केगल एक्सरसाईज करण्याची शिफारस केली जाते. याशिवाय आता वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापरही करून घेता येऊ शकतो.