कसा उघडकीस आला प्रकार?
भंडाऱ्याच्या महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे 10 दिवसांचे बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच अधिकारी चौकशीसाठी तिथे पोहोचले. मात्र संबंधित महिलेने बाळाला घेऊन तिथून पळ काढला. यामुळे त्या महिलेवर संशय बळावला. पोलिसांनी तातडीने आपली चक्रे फिरवत बाळाला ताब्यात घेतले. पोलिसांनी तपास केले असता हा सगळा प्रकार गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा असल्याचे समोर आले.
३ लाखात बाळाची विक्री
पोलिसांनी तपास केले असता बाळाला ३ लाखात विकल्याचे समोर आले. 3 लाखांपैकी 1 लाख रुपये रोख आणि 1 लाखाचा धनादेश डॉक्टरच्या मध्यस्थी असलेल्या महिलेच्या खात्यात जमा झाला होता.उर्वरित 1 लाख रुपये 5 फेब्रुवारीला दिले जाणार होते.
बाळाची विक्री कशी करण्यात आली
गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये एका दाम्पत्यानं आपल्या 10 दिवसांच्या मुलीला उपचारासाठी दाखल केले होते.डॉ. नितेश बाजपेयी याने उपचाराचा खर्च खूप जास्त होईल, अशी भीती पालकांना घातली. नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत आम्ही मुलीवर मोफत उपचार करू, अशी खोटी बतावणी करून डॉक्टरने पालकांकडून मुलीला आपल्या ताब्यात घेतले. मात्र, उपचाराऐवजी या डॉक्टरने भंडाऱ्याच्या पांढराबोडी येथील एका महिलेला या चिमुकलीची 3 लाख रुपयांत विक्री केली.
गुन्हा दाखल
ललेश्वरी सादेपाच या महिलेला अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी आणि इतर 3 आरोपी फरार आहेत. पोलीस फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली आहे. बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये आणखी किती जण यात आरोपी आहेत याचा तपास पोलीस करत आहे.
गुन्हा दखल करण्यात आलेल्यांची नावे
१) डॉ नितेश बाजपेयी – गोंदिया
२) मालती वाघमारे – पांढराबोडी भंडारा
३) पौर्णिमा धुर्वे – गोंदिया
४) ललेश्वरी सादेपाच – गोंदिया
५) उमेशसिंग गहलोत – गोंदिया
Ans: भंडारा-गोंदिया जिल्ह्यात.
Ans: डॉ. नितेश बाजपेयीसह पाच जणांवर.
Ans: अंदाजे 3 लाख रुपयांत.






