फोटो सौजन्य: iStock
आजच्या काळात अनेक जण आपले करिअर उत्तम बनवण्यासाठी वेगवेगळ्या डिग्री घेत असतात. ग्रॅज्युएशन झाले की लगेच पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यास अनेक विद्यार्थ्यांचा कल असतो. पण काही विद्यार्थी असे सुद्धा असतात ज्यांना डिग्री घेणे आवडत नसते. परंतु, चांगल्या जॉबसाठी डिग्री घेणे महत्वाचे आहे या कारणामुळे ते एकाच डिग्रीसाठी दोन तीन वर्ष शिकत असतात. पूर्वी अशा स्थितीतून प्रत्येक विद्यार्थ्याला वाट काढावी लागायची. पण आजच्या डिजिटलच्या युगात तुमच्याकडे फक्त स्किल्स असेल तरी उत्तम नोकरी सहज मिळवता येते.
आज, अनेक करिअर पर्याय उपलब्ध झाले आहेत ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पदवीची आवश्यकता नाही. या नोकऱ्या केवळ आकर्षकच नाहीत तर त्या उत्तम पगार देखील देतात. चला जाणून घेऊया काही मोठ्या नोकऱ्यांबद्दल ज्यांच्यासाठी पदवी आवश्यक नाही.
एअर होस्टेस होण्यासाठी तुम्हाला फक्त 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे उत्तम कम्युनिकेश स्किल्स असेल आणि तुम्ही शारीरिक बाबींची पूर्तता करण्यास सक्षम असाल तर या क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता. नवीन एअर होस्टेसला सुमारे 20,000 ते 25,000 रुपये मासिक पगार मिळतो आणि तो अनुभवाच्या मदतीने दुप्पट होतो.
खरंय शिक्षणाला वयाची अट नसते; 81 व्या वर्षात घेतला कॉलेजमध्ये प्रवेश
कमर्शियल पायलट होण्यासाठी कोणत्याही विशेष पदवीची आवश्यकता नसते. यासाठी तुम्हाला फक्त 12वी विज्ञान शाखेत उत्तीर्ण व्हावे लागेल आणि फ्लाइंग स्कूलच्या प्रवेश परीक्षेला बसावे लागेल. या व्यवसायात तुमचे मासिक उत्पन्न 5 ते 6 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
ग्राफिक डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला पदवीची गरज नाही. हल्ली अनेक तरुण ग्राफिक डिझायनिंग क्षेत्राकडे जास्त वळताना दिसत आहे. डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करून तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करू शकता. ग्राफिक डिझायनर्सची मागणी सतत वाढताना दिसत आहे आणि त्यांना चांगले पॅकेज देखील मिळत आहे. अनेक अॅड एजन्सी व युट्युब क्रिएटर्सना ग्राफिक डिझायनरची गरज भासत आहे.
कसे बनता येईल क्रिकेट अंपायर? समजून घ्या ‘ही’ पूर्ण प्रक्रिया, मिळवाल लाखो रुपये
सध्याच्या युगात डिजिटल मार्केटिंग हे एक मोठे क्षेत्र आहे, ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती ऑनलाइन कोर्स करून आपले कौशल्य विकसित करू शकते. अनेक प्रायव्हेट इंस्टीट्यूट डिजिटल मार्केटिंगवर आधारित वेगवेगळे कोर्स ऑफर करत असतात. यानंतर तुम्ही इंटर्नशिप करून या क्षेत्रात चांगली नोकरी मिळवू शकता.
मेकअप आर्टिस्ट होण्यासाठी पदवी आवश्यक नाही; तुम्ही मोफत ऑनलाइन कोर्स करूनही या क्षेत्रात प्रवेश करू शकता. मेकअप आर्टिस्टचा पगारही चांगला आहे. तसेच जसजसे तुमचा अनुभव वाढेल तसतसा तुमचा पगार देखील वाढेल.






