फोटो सौजन्य: iStock
नुकतेच आयपीएलच्या येणाऱ्या सीझनसाठी ऑक्शन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अनेक टी 20 प्रेमींना वेध लागले आहे ते आयपीएलच्या सामन्यांचे. पण तुम्ही जेव्हाही क्रिकेट पाहता तेव्हा अंपायरची भूमिका ही किती महत्वाची असते हे सांगण्याची गरज नाही. आपलीकडे आजही क्रिकेट हा फक्त एक खेळ म्हणून पाहिला जात नाही, तर एक उत्सव म्हणून पाहिला जातो.
जरी क्रिकेटने इंग्लडच्या मातीत जन्म घेतला असला तरी त्याची भरभराट ही भारतातच झाली आहे. भारतात क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक लहान मुलाचे सवपन असते की आपण सुद्धा मोठे होऊन एकदा तरी देशासाठी खेळावे. परंतु प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. अशावेळी प्रश्न उदभवतो की मग क्रिकेट संबंधित कोणत्या फिल्डमध्ये करिअर होऊ शकते.
UIDAI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! पगार तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत
क्रिकेटमध्ये खेळाडू व्यतिरिक्त अंपायरिंग करणे देखील एक चांगले करिअर असू शकते. परंतु खूप कमी लोकांना ठाऊक असते की अंपायर नेमके कसे बनता येईल. चला आज जाणून घेऊया की अंपायर कसे बनता येऊ शकते.
क्रिकेट अंपायर बनण्याची प्रक्रिया अनेक टप्प्यात विभागली गेली आहे. ही प्रक्रिया तुमच्या क्रिकेटच्या ज्ञानाचीच नव्हे तर तुमची शारीरिक तंदुरुस्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील तपासते. याबद्दल सविस्तर समजून घेऊया.
अंपायर होण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या संबंधित राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये नोंदणी करावी लागते. यासाठी स्थानिक सामन्यांमध्ये अंपायरिंगचा अनुभव घेणे महत्वाचे आहे.
तुम्हाला स्थानिक स्तरावर काही सामन्यांचे अंपायरिंग करावे लागतील जेणेकरून तुम्हाला या क्षेत्रात अनुभव घेण्यास मदत होईल. हा अनुभव तुमचे नाव पुढे नेण्यास मदत करेल.
एकदा तुम्ही तुमच्या राज्य संघटनेमधील अंपायरिंगचा पुरेसा अनुभव प्राप्त केल्यानंतर, तुमचे नाव BCCI (Board of Control for Cricket in India) द्वारे आयोजित लेव्हल 1 परीक्षेसाठी पाठवले जाईल.
बीसीसीआयतर्फे तीन दिवस कोचिंग क्लासेसचे आयोजन करण्यात येते, त्यानंतर चौथ्या दिवशी लेखी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाते.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना इंडक्शन कोर्ससाठी बोलावले जाते, जेथे खेळाचे नियम आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर माहिती दिली जाते.
इंडक्शन कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही या परीक्षांमध्ये यशस्वी झालात तरच तुम्ही लेव्हल 2 च्या परीक्षेसाठी पात्र ठरतात.
लेव्हल 2 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्हाला मेडिकल टेस्ट देखील द्यावी लागते, ज्यामध्ये तुमची शारीरिक क्षमता तपासली जाते.
जेव्हा तुम्ही सर्व वरील टप्पे यशस्वीरीत्या पार करता तेव्हा तुम्हाला बीसीसीआयकडून अंपायर म्हणून मान्यता मिळते. या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही एक योग्य क्रिकेट अंपायर बनू शकता, जो वेगवेगळ्या सामन्यात अंपायरिंग करू शकतो.
एका अंपायरचा पगार हा त्याचा दर्जा, अनुभव आणि ज्येष्ठता यावर अवलंबून असतो. तरीही वृत्तानुसार, BCCI मधील A+ आणि A श्रेणीतील अंपायरना देशांतर्गत सामन्यांसाठी दररोज 40,000 रुपये मिळतात. तर, B आणि C श्रेणीतील पंचांना प्रतिदिन 30,000 रुपये मिळतात. अंपायरचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल तर त्याला आयसीसी पॅनलमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. आयसीसीच्या एलिट पॅनलच्या अंपायर्सना प्रति सामना 1.50 ते 2.20 लाख रुपये मिळतात. ज्यामुळे त्यांचा वार्षिक पगार 75 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकतो.






