फोटो सौजन्य - Social Media
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत कार्यरत असलेली एक अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आहे. ही संस्था काकरापार गुजरात प्रकल्पासाठी विविध पदांवर भरती करत असून त्यासाठी NPCIL/KAKRAPAR GUJARAT SITE/HRM/01/2025 ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात उच्च-तंत्रज्ञानाच्या वातावरणात काम करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
ही भरती प्रक्रिया 28 मे 2025 पासून सुरू होत असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जून 2025 रोजी सकाळी 11:00 वाजेपर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी NPCIL च्या अधिकृत वेबसाइट www.npcilcareers.co.in ला भेट द्यावी. या भरतीसाठी भारतातील कोणताही पात्र नागरिक अर्ज करू शकतो. यामध्ये नवशिक्या आणि अनुभवी दोघांनाही संधी आहे.
सध्या प्रसिद्ध झालेल्या संक्षिप्त अधिसूचनेमध्ये वयोमर्यादेची सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र वयोमर्यादा व त्यातील सूट केंद्र सरकारच्या नियमानुसार असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरच प्रसिद्ध होणारी सविस्तर अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. निवड प्रक्रिया ही पदानुसार लेखी परीक्षा किंवा संगणक आधारित परीक्षा, कौशल्य चाचणी किंवा मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांमधून होणार आहे. अंतिम निवड ही उमेदवारांच्या गुणवत्ता यादी आणि निवड प्रक्रियेतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे – उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी, ऑनलाईन फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करावी आणि अर्ज सबमिट करावा. अर्जाची प्रिंट स्वतःकडे ठेवावी, जेणेकरून भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकेल. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी NPCIL भरती 2025 ही एक उत्तम संधी असून त्यांनी दिलेल्या वेळेत अर्ज करावा व ही संधी साधावी.