फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट आणि वॉचमन-कम-गार्डनर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना centralbank.bank.in या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागेल. अर्जाची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2025 आहे. ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया सोशल अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (CBI-SUAPS) अंतर्गत केली जात आहे.
काही शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. वॉचमन-कम-गार्डनर पदासाठी उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अटेंडंट पदासाठी 10वी पास उमेदवार पात्र आहेत. ऑफिस असिस्टंट पदासाठी बीए, बीकॉम किंवा बीएसडब्ल्यू पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात, असे बंधनकारक आहे तर फॅकल्टी पदासाठी पदवी किंवा पदव्युत्तर (MSW/MA/सोशियॉलॉजी/बीएससी/बीए बीएड) उमेदवार पात्र आहेत. या भरतीत अनुभवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांचे वय 22 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ही भरती करारावर आधारित आहे. मुळात, ही भरती 1 वर्षासाठी कराराधारित असेल. पुढे बँकेच्या नियमानुसार कालावधी वाढवता येईल.
आयोजित पगारमण पाहिले तर, फॅकल्टी पदासाठी ₹30,000/महिना देण्यात येणार आहेत. ऑफिस असिस्टंट पदासाठी ₹20,000/महिना तर अटेंडंट पदासाठी ₹14,000/महिना देण्यात येणार आहेत. वॉचमन-कम-गार्डनर पदासाठी ₹12,000/महिना देण्यात येणार आहेत.
उमेदवारांची निवड अर्जाच्या छाननीनंतर मुलाखतीद्वारे (Interview) केली जाईल. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: