• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Nashik News Mahanirmiti Ntpc Sinnar Thermal Power Project Update

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप

राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडली आहे. महानिर्मिती आणि NTPC यांच्यातील ही संयुक्त भागीदारी महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 01, 2026 | 04:29 PM
nashik news
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारी
  • अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत
  • राज्याची ऊर्जा सुरक्षा अधिक भक्कम
Nashik News: राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडली आहे. महानिर्मिती आणि एनटीपीसी (NTPC) यांच्यातील ही संयुक्त भागीदारी महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सिन्नर तालुक्यातील 1350 मेगावॅट क्षमतेच्या सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (एसटीपीएल) प्रकल्पाचा ताबा महानिर्मिती आणि एनटीपीसी लिमिटेड यांच्या 50:50 संयुक्त भागीदारीतून अधिकृतरीत्या घेण्यात आला आहे. दिल्ली येथील एनटीपीसी मुख्यालयात मंगळवारी दिनांक 24 फेब्रुवारीला अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी सादर करण्यात आलेल्या संकल्प योजनेला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांची 28 नोव्हेंबर 2025 रोजी मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आवश्यक असलेली 3800.14 कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली. ही प्रक्रिया दिवाळखोरी व शोधन अक्षमता संहिता (IBC) 2016 अंतर्गत पूर्ण करण्यात आली.

Nashik News: समृद्धीवर रक्ताचे सडे… ! ८ महिन्यांत २४ बळीं, मदतीसाठी तासन् तास पहावी लागते वाट

अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत

सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड (STPL) हा प्रकल्प अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आणि कायदेशीर वादात अडकला होता. दिवाळखोरी व शोधन अक्षमता संहिता (IBC) अंतर्गत 3800.14 कोटी रुपये अदा करून हा ताबा मिळवणे, हे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे यश मानले जाते. यामुळे खाजगी क्षेत्रातील ‘डेड असेट्स’ (बंद मालमत्ता) सरकारी सहभागातून कशा प्रकारे पुनरुज्जीवित करता येतात, याचा एक आदर्श पायंडा पडला आहे.

पुनरुज्जीवन धोरणाला या निर्णयामुळे बळ

राज्य सरकारच्या संकटग्रस्त मालमत्तांच्या पुनरुज्जीवन धोरणाला या निर्णयामुळे बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा पायाभूत सुविधांच्या पुनर्बाधणीस वेग मिळाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. (IAS) तसेच एनटीपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गुरुदीप सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अधिग्रहणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली.

राज्याची ऊर्जा सुरक्षा अधिक भक्कम

दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या अधिग्रहणामुळे महानिर्मितीची तापीय उत्पादन क्षमता 10,200 मेगावॅटवरून 11550 मेगावॅटपर्यंत वाढणार आहे. ताप, गॅस, सौर व जलविद्युत प्रकल्पांसह एकूण स्थापित क्षमता १५ गिगावॅटच्या पुढे जाणार असून, राज्याची ऊर्जा सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे.

दोन युनिट्स आठ महिन्यांत सुरू

अधिग्रहणानंतर प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची प्राथमिक कामे हाती घेण्यात आली आहेत. थर्मल पावर प्रकल्पात 270 मेगावॅट क्षमतेचे 5  युनिट आहेत. पहिल्या दोन युनिट्स 6 ते 8 महिन्यांत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. उर्वरित तीन युनिट्स पुढील 2 ते 3 वर्षांत सुरू करण्याचा आराखडा आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वीजप्रणालीत विश्वासार्ह ‘बेस-लोड’ क्षमतेची भर पडणार आहे.

रोजगार, औद्योगिक विकासाला चालना

प्रकल्प सुरू झाल्यानंतर अभियंते, तांत्रिक कर्मचारी, कुशल-अकुशल कामगार तसेच पूरक सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. नाशिक परिसरातील औद्योगिक वाढीलाही यामुळे चालना मिळणार आहे.

Nashik News : सिंहस्थात AI चा वापर होणार, गर्दीचे नियोजन करताना भाविकांना रामकुंडापर्यंत नेणार

Web Title: Nashik news mahanirmiti ntpc sinnar thermal power project update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • ias
  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik News:अतिक्रमण काढूनही शहरातील वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त
1

Nashik News:अतिक्रमण काढूनही शहरातील वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

Nashik News : कथित कंटेनर लुटीचा तपास CIDकडे, ग्रामीण दलालाला बसणार झटका?; पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय
2

Nashik News : कथित कंटेनर लुटीचा तपास CIDकडे, ग्रामीण दलालाला बसणार झटका?; पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय

Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार
3

Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार

Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन
4

Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’

Mar 01, 2026 | 06:19 PM
Mumbai-Goa Highway:रखडपट्टीवरून ठेकेदारांना दणका, महामार्गाचं काम रखडवणाऱ्या कंपन्यांना १६ कोटींचा दंड

Mumbai-Goa Highway:रखडपट्टीवरून ठेकेदारांना दणका, महामार्गाचं काम रखडवणाऱ्या कंपन्यांना १६ कोटींचा दंड

Mar 01, 2026 | 06:10 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल

‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल

Mar 01, 2026 | 05:55 PM
Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?

Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?

Mar 01, 2026 | 05:49 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
….म्हणून म्हणतात दीपिकाला होलीक्वीन ‘बलम पिचकारी’ ते  ‘बेशरम रंग’ बॉलिवूडची टॉप गाणी ज्यांच्याशिवाय होळी अपूर्णच

….म्हणून म्हणतात दीपिकाला होलीक्वीन ‘बलम पिचकारी’ ते ‘बेशरम रंग’ बॉलिवूडची टॉप गाणी ज्यांच्याशिवाय होळी अपूर्णच

Mar 01, 2026 | 05:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM
Virar :  जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 03:31 PM
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.