केरळच्या डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. या पौष्टिक आणि कॅल्शियम युक्त पदार्थामध्ये दुधाचा समावेश आहे. शरीरातील हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी अनेकदा डॉक्टरसुद्धा दूध पिण्याचा सल्ला देतात. दूध आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. दुधामध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. एवढंच नसून दुधाचा वापर करून मिठाईमधील आणि इतर अनेक पदार्थ बनवले जातात. तसेच घरी आणलेले कच्चे दूध व्यवस्थित उकळून मगच पिण्यासाठी आणि पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. कच्च्या दुधाचा वापर पिण्यासाठी केला जात नाही. नेहमी उकळलेले दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: आळशी खाण्याने युरिक अॅसिड कमी होते का?
कच्च्या दुधाचा वापर प्रामुख्याने मिठाईतील पदार्थ बनवताना केला जातो. पण काही दिवसांआधी केरळच्या डॉक्टरांनी केलेल्या दाव्यानुसार कच्चे दूध आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे सांगण्यात आले आहे, कच्च्या दुधाचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. कच्च्या दुधात कोलाई, कॅम्पिलोबॅक्टर, येर्सिनिया, ब्रुसेला, कॉक्सिएला आणि लिस्टेरिया यांसारखे जीवघेणे विषाणू आढळून आले आहेत. कच्च्या दुधात आढळून येणारे जिवाणू मानवी शरीरासाठी घातक आहेत.
डॉक्टरांनी केलेल्या दाव्यानुसार, कच्च्या दुधात असलेले जिवाणू मेंदू आणि हृदयावर हल्ला करतात. यामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. कच्च्या दुधाचे सेवन केल्यामुळे शरीरसंबंधित अनेक घातक आजार होऊ शकतात. या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपले मत मांडले आहे.
पंजाबमधील एका महिलेने बाळाला बादलीतून कच्चे दूध दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यावर डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, “विनम्र विनंती. कृपया कच्चे दूध पिऊ नका आणि तुमच्या मुलांना कच्चे दूध देऊ नका. हे छान दिसते आणि छान वाटते कारण असे वाटते की तुम्ही हे आमच्या पूर्वजांनी आणि सर्वांप्रमाणेच नैसर्गिक पद्धतीने करत आहात, परंतु लक्षात ठेवा की आमचे पूर्वज 25-30 वर्षे खूप दीर्घ आयुष्य जगले, असे डॉक्टर म्हणाले.
हे देखील वाचा: डायबिटीसच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे हे ड्रायफ्रूट
कच्च्या दुधात असलेले जंतू प्रत्यारोपणाचे रुग्ण, एचआयव्ही एड्स, कर्करोग आणि मधुमेह, लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांसारख्या कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर परिणाम करतात. त्यामुळे कच्च्या दुधाचे सेवन करू नये. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यातील एका व्यक्तीच्या मते, मागील १८ वर्षांपासून मी नियमित कच्च्या दुधाचे सेवन करत आहे. माझे वडील सुद्धा 80 वर्षांचे आहेत ते सुद्धा कच्च्या दुधाचे सेवन करतात.