Maharashtra Breaking News Updates Today:
19 Feb 2026 10:05 AM (IST)
इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली होती. लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत मंगळवारी तरुणी गेली होती. यावेळी दोन तरुणांनी तरुणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून तीच अपहरण केल्याचे सांगण्यात आलं होतं. आता या अपहरण प्रकरणाला नवीन ट्विस्ट आलं आहे. मुलीने स्वतः व्हिडीओ बनवून याबाबतची माहिती दिली. माझे संबंधित मुलासोबत प्रेमसंबध आहेत, मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आल्याचे तिने व्हिडिओत म्हंटल आहे.
19 Feb 2026 09:55 AM (IST)
९ कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर राजपाल यादव यांचे याबद्दल पहिलेच वक्तव्य समोर आले आहे. या कठीण काळात सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तुरुंगाच्या परिस्थितीबाबत त्यांनी एक अनोखे आवाहनही केले आहे. तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राजपाल यांनी देशभरातील शुभचिंतकांचे आणि चित्रपट उद्योगातील शुभचिंतकांचे त्यांच्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. तुरुंग प्रशासनाने स्वतंत्र धूम्रपान क्षेत्र निर्माण करावे अशी मागणीही त्यांनी केली. आता अभिनेते नक्की काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.
19 Feb 2026 09:45 AM (IST)
टी-२० विश्वचषक २०२६ चा ३६ वा सामना १८ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे भारत आणि नेदरलँड्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. हा स्पर्धेत भारताचा सलग चौथा विजय होता. नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नेदरलँड्स २० षटकांत केवळ १७६ धावाच करू शकला परिणामी संघाला पराभव पत्करावा लागला.
19 Feb 2026 09:35 AM (IST)
कांद्याची साठवणक्षमता नसल्याने त्याची त्वरित विक्री होणे अपेक्षित आहे. यासाठी स्वस्त धान्य (रेशन) दुकानातून ग्राहकांपर्यंत कांदा पोहोचवल्यास ग्राहकांना स्वस्तातील कांदाही मिळेल आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल, अशा स्वरुपाचा प्रस्ताव कृषी मूल्य आयोगासमोर मांडला आहे.
19 Feb 2026 09:25 AM (IST)
जळगाव जिल्ह्यात टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून, प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. ज्येष्ठतेच्या आधारे टीईटी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, काही शिक्षकांनी या प्रक्रियेला आक्षेप घेत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.
19 Feb 2026 09:15 AM (IST)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्त दरवर्षी हजारो शिवभक्त शिवनेरी या किल्ल्यावर येत असतात. शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते. असे असताना यंदा मात्र शिवनेरी गडावरच मोठी चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले आहे. या चेंगराचेंगरीत 15 ते 20 शिवभक्त जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Marathi Breaking News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अनेक जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी सकाळी ९:४० वाजता भारत मंडपम येथे होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी ९:१५ वाजता शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या २० देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे आणि सरकार प्रमुखांचे स्वागत करतील.
पंतप्रधान मोदींचे भाषण सकाळी १०:२५ वाजता सुरू होईल. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासह अनेक जागतिक नेते आणि उद्योगपती शिखर परिषदेत उपस्थित राहतील. दरम्यान, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा बुधवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. नवी दिल्लीत उतरल्यानंतर त्यांनी एक्सवर लिहिले, “नमस्ते, भारत! मी पुन्हा एकदा भारतात आलो आहे. माझा अजेंडा संबंध मजबूत करणे, भागीदारी वाढवणे आणि जगात एआयच्या भविष्यावर चर्चा करणे आहे.”






