पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया ने आयोजित केलेल्या बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चा अंतिम टप्पा आज पार पडला आहे. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय क्रीडा संकुल या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते अमीर खान यांनी फ्लॅग ऑफ केल्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. देश विदेशातील जवळपास 165 सायकल सवार या स्पर्धेत सहभागी झाले असून पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या प्रशस्त रस्त्यावरून पुण्याच्या दिशेने सुसाट वेगाने या सायकल स्वरांनी अवघ्या काही तासात जवळपास शंभर किलोमीटरचा प्रवास केला आहे. सुसाट वेगाने जाणाऱ्या सायकल सवारांची ही स्पर्धा पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड करांनी देखील रस्त्याच्या कडेला मोठी गर्दी केली होती. तसेच सायकल सवार पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरून जात असताना पिंपरी चिंचवड करांनी मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत केल आहे.