युद्धविराम की तिसरे महायुद्ध? अबू धाबीत रशिया-युक्रेन शांतता चर्चेसाठी आमने-सामने, जगाचा श्वास रोखला!
सध्या या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीबाबत अनिश्चितता कायम आहे. दोन्ही देशातीलल अनेक आव्हाने आणि अडथळ्यामुळे याबाबत अद्याप कोणताही ठोस निकाल लागलेला नाही. युद्धाला सुरुवात झाल्यापासून युक्रेनमध्ये मोठे मानवी आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रशियाच्या उर्जा सुविधा, पायाभूत सुविधांवरील हल्ल्यामुळे अनेक शहरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच तापमान घसरले असून प्रचंड थंडीचे वातावरण आहे. यामुळे चर्चेत अनेक अडथळे येत आहे. या सर्व समस्या दूर करण्यासाठी ही शांतता चर्चा अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
दरम्यान याच वेळी दोन्ही देशात क्षेत्रीय वादामुळे युद्धबंदीवर अनिश्चितता कायम आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी डोनबास डोनेत्सकचा २० टक्के भागाचा आग्रह धरला आहे. परंतु युक्रेनेच अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील कोणताही प्रदेश रशियाला देणार नाही हे स्पष्ट केले आहे. या मतभेदांमुळे शांतता चर्चेत मोठा अडथळा निर्माण होत आहे.
सध्याअमेकिन राजदूतांच्या मध्यस्थीने होणाऱ्या या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या चर्चेत अनेक अडथळे आणि आव्हाने आहेत. यामुळे चार वर्षापासून सुरु असलेले युद्ध थांबणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या युद्धाने केवळ युक्रेनवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिणाम झाला आहे. रशियाच्या कठोर अटी आणि युक्रेनच्या ठोस भूमिकेमुळे सध्या युद्धबंदीची चर्चा अजून दीर्घकाळ सुरु राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चर्चेकडे जग शांततेसाठी अत्यंत आशेने पाहत आहे, परंतु अनिश्चितता कायम आहे.
Ans: संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानी अबू धाबीमध्ये रशिया युक्रेन शांतता चर्चा सुरु आहे.
Ans: रशिया युक्रेन मध्ये डोनबास, डोनेत्सक क्षेत्रावरुन वाद सुरु आहे. रशियाने हे प्रदेश मागितले असून युक्रेनने याला ठाम नकार दिला आहे.






