अकोला जिल्ह्यातील रुग्णसेवक पराग गवई समाजसेवेचं प्रतीक ठरलेले पराग गवई यांनी रुग्णसेवेतून थेट जनसेवेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवेला जनतेने कौल देत सार्वत्रिक महापालिका यंदाच्या निवडणुकीत त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं आहे. अनोळखी ८०० हून अधिक मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार, ४३ वेळा रक्तदान आणि ७ हजारांहून अधिक रक्तपिशव्या संकलनाचा पराग गवई यांचा सेवायज्ञ आहे. गरजूंच्या मदतीला धावणारे पराग गवई हे अकोल्यातील सर्वसामान्यांचा आधार बनले आहेत. त्यांच्या निस्वार्थ सेवेला जनतेने कौल देत सार्वत्रिक महापालिका यंदाच्या निवडणुकीत ८,९९३ मतांनी त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं आहे. अकोला महापालिकेच्या प्रभाग १४ मधून वंचित बहुजन आघाडीचं संपूर्ण पॅनल विजयी झालं आहे. निवडणुकीत स्पष्ट बहुमताने विजय मिळवत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. आज नगरसेवक म्हणून काम करताना ते आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि गरीबांसाठीच्या योजनांवर विशेष भर देत आहेत. “रुग्णसेवक म्हणून मिळालेला अनुभवच माझी खरी शिदोरी आहे. लोकांची सेवा हेच माझे ध्येय आहे,” असे ते सांगतात. .