Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने विशेष काळजी घेतली आहे. मे महिन्यात या संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुदानित किंवा शासकीय शाळंमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 01, 2026 | 09:56 AM
Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका
Follow Us
Follow Us:
  •  राज्यातील ७३६ शिक्षणसंस्थांना सरकारी अनुदानासाठी अपात्र
  • या संस्थांपैकी अनेक संस्था आजपर्यंत विनाअनुदान तत्वावर काम करत होत्या
  • या शासन निर्णयाचा परिणाम प्रखरतेने मुंबईमध्ये जाणवला आहे.
 

Maharashtra  Education News: राज्य शासनाच्या शिक्षण विभागातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने तब्बल राज्यातील ७३६ शिक्षणसंस्थांना सरकारी अनुदानासाठी अपात्र ठरवले आहे. यातील ३२४ माध्यमिक शाळा आणि ४१२ कनिष्ठ महाविद्यालयीन विभागांचा समावेश आहे.  सबंधित संस्थांना गेली अनेक  वर्षे संधी देऊनही पात्रता निकष पूर्ण न केल्याने  शासनाने हा निर्णय घेतल्याची  प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संस्थांपैकी अनेक संस्था आजपर्यंत विनाअनुदान तत्वावर काम करत होत्या. सदर संस्थाना अनेकवेळा पात्रतेसाठी संधीही देण्यात आल्या होत्या, तरीही त्यांनी हे निकष पूर्ण केले नाहीत. मात्र शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, कर्मचारी भरतीचा आराखडा, यांसह शैक्षणिक आणि प्रशासकीय निकष पूर्ण केल्यास त्यांना वेतनासाठीचे अनुदान मिळेल, असेही राज्य शासनाकडून  सांगण्यात आले होते.

Exclusive Series: ग्रामीण वर्गखोल्यांमध्ये रूढींना आव्हान, एका शिक्षकाच्या धाडसाने संपूर्ण शाळेची व्यवस्था बदलते आहे

कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका?

या शासन निर्णयाचा परिणाम प्रखरतेने मुंबईमध्ये जाणवला आहे. ठाणे, पालघर आणि मुंबई या तीन जिल्ह्यात सर्वाधिक १६८ संस्थांचे सरकारी अनुदान बंद होणार आहे, तर पुणे, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यातील संस्थांनाही मोठा फटका बसणार आहे, अगदी अशीच परिस्थिती ग्रामीण भागातील काही जिल्ह्यात दिसून येत आहे.

अनुदानापासुन वंचित असणाऱ्या संस्थांची जिल्हानिहाय आकडेवारी –

६८ ठाणे
५४ मुंबई
४६ पालघर
२६ पुणे
२१ रायगड
१९ नाशिक

विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने घेतली विशेष खबरदारी –

दरम्यान, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने विशेष काळजी घेतली आहे. मे महिन्यात या संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुदानित किंवा शासकीय शाळंमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.

‘B.Com’च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! मुंबई विद्यापीठाने १६ दिवसांत जाहीर केला निकाल; ४०.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते, वारंवार संधी देऊनही पात्रता निकष पूर्ण न केल्यास संबंधित संस्थांवर कारवाई करणे आवश्यक आहे, तर काही तज्ञांच्या मते, अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर प्रश्न निर्माण होऊ शकतो.

महाराष्ट्र राज्य मुख्यध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांची प्रतिक्रिया –

संस्था चालवण्याची मान्यता शासनाने दिली असताना पात्रता आणि स्वयंअर्थसहाय्यिता मान्यतेची अट घालण्याची काय गरज होती ? असा प्रश्न उपस्थित करत या शासन निर्णयावर महेंद्र गणपुले यांनी खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्य शासनाने संबंधित संस्थांना नियमांच्या कक्षेत येण्यासाठी एक शेवटची संधी दिली आहे. ज्या संस्थांचे स्वरूप अद्याप निश्चित नाही, त्यांच्यासाठी ‘स्वयंअर्थसहाय्यित’ (Self-Financed) तत्त्वाचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित संस्थांना ३० एप्रिल २०२६ पर्यंत स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर नव्याने मान्यता घेणे बंधनकारक असेल, त्यासाठी या संस्थांनी स्वतःहून पुढाकार घेऊन नवीन निकषांनुसार मान्यता मिळवावी, असा कायदेशीर पर्यायही दिला आहे. पण त्याचवेळी दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर संबंधित संस्थांची पूर्वीची मान्यता रद्द केली जाईल, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

 

Web Title: Maharashtra education grants stoppage for 324 schools and 412 junior colleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Career News
  • Education News in Marathi
  • Maharashtra Education

संबंधित बातम्या

CSC Aadhaar: 12 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; 7 राज्यांमध्ये 312 पदांवर सीएससी भरती, 20 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज
1

CSC Aadhaar: 12 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; 7 राज्यांमध्ये 312 पदांवर सीएससी भरती, 20 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

MBA Admission: एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर! ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज
2

MBA Admission: एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर! ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज

Engineering Admission: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली कॅप राउंड यादी जाहीर! १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना संधी
3

Engineering Admission: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली कॅप राउंड यादी जाहीर! १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना संधी

परदेशातून MBBS केल्यानंतर FMGE पास होण्यासाठी किती वर्षे लागतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती
4

परदेशातून MBBS केल्यानंतर FMGE पास होण्यासाठी किती वर्षे लागतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.