Pimpri-Chinwad News: डॅमेज कंट्रोलिंगसाठी भाजपचा पलटवार; शंकर जगतापांकडून अजित पवारांना धक्का
शनिवारी प्रचाराचा नारळ फोडताना माजी नगरसेवक (प्रभाग क्रमांक 17 मधील) ॲड. संदीप चिंचवडे, राजेंद्र साळुंखे, (प्रभाग क्रमांक 32) सुषमा तनपुरे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, तसेच संदिप श्रीधर वाल्हेकर यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भक्ती शक्ती समूह शिल्पा जवळ प्रचाराचा शुभारंभ करताना प्रवेश करण्यात आला. आणि या प्रवेशामुळे नवी सांगवी, सांगवी, पिंपळे गुरव भागातील भाजपची ताकद वाढणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि 2)
पत्रकार परिषद घेऊन तथ्यहीन आरोप केले. ज्यामध्ये आमच्या उमेदवारांना दबावाखाली ठेवले जात आहे. माघार घेण्यासाठी साम-दाम दंड भेदाचा अवलंब केला जात आहे असे तथ्यहीन आरोप केले. अजित पवार यांचे हे स्क्रिप्टेड भाषण आणि स्क्रिप्टेड आरोप आजच्या प्रवेशाने अक्षरशः खोडून काढले. निगडी येथील भक्ती शक्ती समूहाच्या प्रांगणामध्ये आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या पक्षप्रवेशाने विजयाचा पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला.
भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांवर केव्हाही, कधीही अन्याय करत नाही. विरोधक तथ्यहीन आरोप करतील मात्र आम्ही विकासाच्या गोष्टीतून त्यांना पिंपरी चिंचवडचे नवे पर्व दाखवून देणार आहोत.बोलायला जेव्हा मुद्दे कमी पडतात तेव्हा आरोपांच्या फैरी झडतात. आजच्या पक्ष प्रवेशाने हेच दाखवून दिले आहे. टीकेवर टीका करत राहिलो तर विकासाचा मुद्दा मागे पडेल म्हणून आम्ही “विकासाच्या व्हिजन”वर बोलणार आहोत.
शंकर जगताप
आमदार तथा निवडणूक प्रमुख
पिंपरी चिंचवड शहर.






