फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य गृह विभागाने भरतीला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 15631 पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस शिपाई मेगा भरती 2025 ची सुरुवात 29 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आली आहे. आजपासून उमेदवारांना राज्यभरातून अर्ज करता येणार आहेत तसेच मोठ्या संख्येतून अर्ज 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. या गोष्टीचे नोंद नक्की घ्यावी.
या भरतीमध्ये पोलीस शिपाई पदासाठी 12399 पदे भरण्यात येणार आहेत. चालक शिपाई पदासाठी 234 पदे भरण्यात येणार आहेत. सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 2393 पदे भरण्यात येणार आहेत तर कारागृह शिपाई पदासाठी 580 पदे भरण्यात येणार आहेत. बँड्समन पदासाठी 25 पदे भरण्यात येणार आहेत.
राज्यभरातून विविध जिल्ह्यात विविध पदे रिक्त आहेत. सोलापूर ग्रामीण भागात 90 पर्यंत सोलापूर शहर भागात 96 पदे रिक्त आहेत. एस आर पी एफ आणि कारागृह विभाग या क्षेत्रात सुमारे 55 पदे रिक्त आहेत.
रजा करण्याची अट पाहिली तर एका पदासाठी उमेदवार फक्त एका जिल्ह्यातच अर्ज करू शकतो तसेच एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात केलेले अर्ज अवैध ठरवले जातील अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्काची रक्कम 450 रुपये निश्चित करण्यात आली आहे मागास प्रवर्गांसाठी अर्ज शुल्काची रक्कम 350 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांचा समावेश असून पहिल्या टप्प्यात मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर दोन्ही टप्प्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नियुक्त केले जाईल. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी police recruitment 2025.mahAIt.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. राज्यातील पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याने तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देणे हे या भरती मागचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे तसेच खाकी वर्दीचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि पोलिसाला सामील होण्यासाठी इच्छुकांसाठी ही सर्वात मोठी संधी आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची तयारी आधीच करून ठेवावी आणि अर्ज करण्यात यावा






