पुणे विद्यापीठ (फोटो- सोशल मीडिया)
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध
पुणे विद्यापीठाचे एआयसीएचई माहिती भरण्याबाबत महाविद्यालयांना आदेश
एआयसीएचई सर्वेक्षणातील माहिती दि. १५ डिसेंबर रोजी भरणे आवश्यक
पुणे: केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत उच्च शिक्षण विभागाकडून (Career) राबविण्यात येणाऱ्या अखिल भारतीय उच्चतर शिक्षण सर्वेक्षण (एआयसीएचई) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४–२५ ची माहिती भरण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांना तातडीचे आदेश दिले आहेत.
विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, संबंधित महाविद्यालयांनी एआयसीएचई पोर्टलवर आवश्यक माहिती भरणे व अद्ययावत करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक व धुळे जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये तसेच मान्यताप्राप्त संस्थांकडून १५ जुलै २०२५ पासून माहिती मागविण्यात येत आहे.
Pune University च्या ४ ही विद्याशाखांचे अधिष्ठाता पद तीन वर्षांपासून रिक्त; अर्ज सादर करण्यासाठी…
मात्र, परिपत्रकात नमूद केल्यानुसार, उच्च शिक्षण विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून माहिती भरण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली असतानाही काही महाविद्यालयांनी अद्याप एआयसीएचई सर्वेक्षणाची माहिती पूर्णपणे भरलेली नाही. ही बाब गंभीर असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एआयसीएचई सर्वेक्षणातील माहिती दि. १५ डिसेंबर रोजी भरणे आवश्यक आहे. त्यानंतर पोर्टल कायमस्वरूपी करण्यात येणार असल्याची माहिती ई-मेलद्वारे कळविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संबंधित महाविद्यालयांनी गांभीर्याने दखल घेऊन वेळेत माहिती भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर परिपत्रकावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा. डॉ. विनायक जोशी यांची स्वाक्षरी असून, सर्व संबंधित महाविद्यालयांनी या सूचनेची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठात शिक्षक पदासाठी जागा खाली! इच्छुकांनो… संधीचे सोने करा
४ ही विद्याशाखांचे अधिष्ठाता पद तीन वर्षांपासून रिक्त
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चारही विद्याशाखांचे अधिष्ठातापद गेली तीन वर्षे रिक्त आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालकपदही रिक्त झाले आहे. या महत्त्वाच्या पदांच्या भरतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध करून १२ डिसेंबरपर्यंत अर्ज मागवले होते. मात्र आता अर्ज सादर करण्यासाठीची मुदत २८ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीबरोबरच अधिष्ठाता व परीक्षा नियंत्रक पदभरतीही लांबणीवर गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.






