फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. अभियांत्रिकी विभागातील असिस्टंट मॅनेजच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीला ७ डिसेंबर २०२४ पासून सुरुवात करण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. तसेच उमेदवारांना २७ डिसेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, उमेदवारांना ७ डिसेंबरपासून ते डिसेंबरच्या २७ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची विंडो या कालावधीमध्ये खुली असेल, उमेदवारांनी या काळात अर्ज नोंदवावा.एकूण २५ रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण भारतभरही भरती आयोजित आहे, त्यामुळे भारतभरातून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे. उमेदवारांना अर्ज NSCI च्या nsic.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे. अर्ज जरी ऑनलाईन स्वरूपात करायचे असले तरी उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी एका ठराविक पत्त्यावर पाठवावी लागणार आहे. मुळात, अर्ज करताना उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवाराना अर्ज करताना १००० रुपयांची भरपाई करावी लागणार आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील सारख्या रक्कमेची भरपाई अर्ज शुल्क म्हणून करावी लागणार आहे. तर महिलांसाठी अर्ज शुल्क माफ आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज अगदी निशुल्क भारत येणार आहे. PwBD प्रवर्गातील उमेदवारांनाही अर्ज माफ आहे.
अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. या अटी शैक्षणिक आहेत तर काही वयोमर्यादे संदर्भांत आहेत. या अटी शर्ती अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. शैक्षणिक अटीनुसार, अर्ज करता उमेदवार किमान ६०% गुणांनी प्रथम श्रेणीसह BE किंवा बी.टेक क्षेत्रात पदवीधर हवा. तसेच उमेदवाराने GATE परीक्षा उत्तीर्ण केले असावे. पात्राचे प्रमाणपत्र २ वर्षांहून जुने नसावे. तर वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या अटीनुसार, जास्तीत जास्त २८ वर्षी आययू असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात सूर देण्यात येईल. एकंदरीत, अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीमधून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत अधिक ५ वर्षे सूट देण्यात येईल. तर OBC या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ३ वर्षांपर्यंत आयुमध्ये सूट देण्यात येईल. विशेष बाब म्हणजे PwBD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक १० वर्षापर्यंतची सूट देण्यात येईल.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: