फोटो सौजन्य - Social Media
भारतीय स्टेट बँकेने (SBI) भरतीला सुरुवात केली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. भारतीय स्टेट बँकेने या भरती प्रक्रियेविषयी अधिकारीक अधिसूचना जाहीर केली होती. या अधिसूचनेमध्ये या भरती प्रक्रियेविषयी सखोल माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. या अधिसूचनेचा आढावा घेणे इच्छुक उमेदवारांसाठी सोयीस्कर ठरेल. उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेटी द्यावी. एकंदरीत, या भरतीसाठी अर्ज करताना ऑनलाईन मार्ग स्वीकारणे बंधनकारक आहे. कारण, ऑनलाईन स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या भरतीमध्ये सहभाग घेऊ इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावे.
हे देखील वाचा : RRBची बंपर भरती; ११,५५८ रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु, त्वरित करा अर्ज
भारतीय स्टेट बँकेने आयोजित केलेल्या या भरतीमध्ये डेप्युटी मॅनेजर तसेच सहाय्यक मॅनेजरच्या पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ऐकू १५११ रिक्त जागांचा विचार केला जाणार आहे. महत्वाची गोष्ट अशी कि या पदांसाठी महिला व पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात. जर तुम्ही या भरतीमध्ये सहभाग घेण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला भारतीय स्टेट बँकेने जाहीर काही अटी शर्तींना पात्र असणे अनिवार्य आहे.
भारतीय स्टेट बँकेने त्यांच्या अधिसूचनेमध्ये शैक्षणिक तसेच वयोमर्यादेविषयी अटी आणि शर्ती जाहीर केले आहेत. या अटी शर्तीना पात्र असणे उमेदवारांना अनिवार्य आहे. विविध पदांसाठी विविध वयोमर्यादा निश्चित केल्या गेल्या आहेत. डेप्युटी मॅनेजरच्या पदासाठी इच्छुक अस्लोलेल्या उमेदवारांचे किमान वय २५ वर्षे तर कमाल वय ३५ वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच सहाय्यक असिस्टंटच्या पदासाठी अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३७ वर्षे निश्चित केले गेले आहे.
हे देखिल वाचा : भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदी भरतीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
उमेदवारांची नियुक्ती तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. या निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन लिखित परीक्षा घेतली जाईल. तसेच दस्तऐवजांची तपासणी आणि मुलखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भारतीय स्टेट बँकेने जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा नक्की घ्यावा. अर्ज करण्याची मुदत १४ सप्टेंबर २०२४ तारखेपासून ते ४ ऑक्टोबर २०२४ तारखेपर्यंत देण्यात आली आहे.