Iran Israel युद्धात भारताचा बळी! ओमानच्या तेल टँकरवरील हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण देशात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने ओमानच्या ज्या जहाजावर हल्ला केला त्याचे नाव MKD VYOM आहे. ओमानच्या सरकारी वृत्तसंस्थेने याची माहिती दिली असून मस्कटच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर हल्ला झाला असल्याचे सांगतिले आहे. सोमवारी (०१ मार्च २०२६) या तेलवाहू जहाजाला मानवविरहित सूसाईड ड्रोन बोटने लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात एका भारतीय नाविकाचा मृत्यू झाला आहे. या तेल टँकरवर एकूण २० क्रू मेंबर्स होते. ज्यात १५ भारतीय आणि ५ इराणी नागरिकांचा समावेश होता. हल्ल्याची माहिती मिळताच बचाव कार्य तात्काळ सुरु करत २० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, हा हल्ला अशा वेळी करण्यात आला होता जेव्हा पश्चिम आशियात इराण इस्रायल तणाव शिगेला पोहोचला आहे. सध्या या घटनेमुळे भारतात खळबळ उडाली आहे. तसेच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली असून या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. मृताची ओळख पटवून त्याचा मृतदेह भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
इस्रायल-अमेरिकेने केलेल्या संयुक्त कारवाई इराणच्या राजधानी तेहरानसह अनेक प्रमुख शहरांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वात मोठे धार्मिक आणि राजकीय नुकसान झाले आहे. यामुळे इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड्स यांनी बदला घेण्याची धमकी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर होमुर्झ सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. तसेच तेथून जाणाऱ्या तेल जहाजांना लक्ष्य केले जात आहे. या मार्गावरुन कोणत्याही जहाजाला जाऊ दिले जाणार नाही अशा धमकी इराणने दिली आहे.
ओमानच्या टँकरवरील हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेवर दबाव निर्माण झाला आहे. अनेक कंपन्या होमुर्झ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी मोठी वाढ केली होती. मात्र अनेक मोठ्या शिपिंग कंपन्यांना मालवाहतूक सध्या थांबवली आहे. मात्र याचा फटका जागतिक अर्थव्यवस्था आणि तेलाच्या किंमतींवर होण्याची दाट शक्यता आहे.
Iran Israel युद्ध आणखी पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ओमानच्या जहाजावर हल्ला; भारतीय भरडले
Ans: इराणने ओमानच्या किनारपट्टीवर रणनीतिकदृष्ट्या महत्वाच्या होमुर्ज सामुद्रधुनीजवळ एका तेल टँकरवर हल्ला केला आहे.
Ans: इराणच्या ओमानच्या तेल टँकरवरील हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
Ans: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड्स यांनी बदला घेण्याची धमकी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर होमुर्झ सामुद्रधुनी बंद करण्यात आली असून या मार्गावरुन कोणत्याही जहाजाला जाऊ दिले जाणार नाही अशा धमकी इराणने दिली आहे.






