Raigad News: राजकारणात मोठा ट्विस्ट! जिल्हा परिषद निवडणूक मित्रपक्षांसोबतच लढवणार, सुनील तटकरेंची मोठी घोषणा
Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं
मुरुड तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीमधील खामदे ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. याप्रसंगी खासदार तटकरे हे स्वतः उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांचे त्यांनी यावेळी पक्षात स्वागत केले आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे आपल्या भाषणात म्हणाले की, “लोकप्रतिनिधीने दबाव तंत्र व जखडून ठेवण्याचे काम कधी करू नये, लोक स्वतंत्र असून ते आपला अधिकार सजगपणे बजावत असल्यामुळेच लोकशाही जिवंत आहे. खामदे व मिठागर गावाला समाज मंदिर व पाणीपुरवठा लाईन लवकरच देण्यात येईल. खासदारकी निवडणुकीत मला सावली ग्रामपंचायतने मोठे मताधिक्य दिले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात जास्तीचे मतदान व्हावे, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. (फोटो सौजन्य – facebook)
आगामी काळात दिघी पोर्टमध्ये स्थानिक लोकांना रोजगार याला प्रथम प्राधान्य देणार आहोत. दिघी पोर्टमध्ये आवश्यक नोकरी मिळण्यासाठी त्याला आवश्यक असणारे पूर्व कोर्स टाटा सेन्टर तर्फे दिले जाणार आहेत. त्यामुळे येथील स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यास महत्वपूर्ण मदत होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे आगरदांडा ते इंदापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण माझ्या पाठपुराव्यामुळे झाले आहे, असेही यावेळी सुनील तटकरेंनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, मुरुड तालुका अध्यक्ष फैरोज घलटे, मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेरमन मनोज भगत, नगराध्यक्षा आराधना दांडेकर, माजी सभापती अशीका ठाकूर, स्मिता खेडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडिक, माजी सरपंच अजित कासार, मिठागर गाव प्रमुख सुनील मिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, हसमुख जैन उपस्थित होते.
खाजणी-रोहा या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असे सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी सांगितलं की, तेलवडे ते शीघ्ने रस्त्यावर वीज खांबे लावून स्वतःचे फोटो लावण्याची परंपरा सुरु आहे. प्रशासकीय कामे ही होतच असतात. समाज मंदिर बांधण्यासाठी शासनाचा निधी खर्च होत असतो. मुरुड तालुक्यातील जनता अलिबाग पार्सल सहन करणार नाही. थोड्याच दिवसात हे पार्सल अलिबाग मध्ये गेलेले दिसून येईल. यापुढे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आमचा नेता सुसंकृत असून जशाच तशे उत्तर दिले जाईल, असा इशारा दांडेकरांनी दिला.






