फोटो सौजन्य - Social Media
सोलापूर येथील डॉ. वि. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC Solapur) भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. ही गट ड (वर्ग ४) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण २० पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पदे कमी असल्यामुळे स्पर्धाही फार असणार आहे. २५ ऑक्टोबर २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरूकरण्यात आली आहे ,तर या अर्जाची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹१००० रुपयांची भरपाई करणे आवश्यक आहे तर इतर समाज जसे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना ₹९०० शुल्क भरावे लागेल. माजी सैनिक उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
या भरतीत सर्व सामाजिक प्रवर्गांसाठी आरक्षण लागू असेल, तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. परीक्षेची तारीख व इतर तपशील पुढील काळात GMC सोलापूरच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.
या पदांसाठी वेतनश्रेणी एस-१ निश्चित असून, पगार ₹१५,००० ते ₹४७,६०० इतका राहील. अनुभवानुसार पगार देण्यात येईल. सरकारी सेवेत प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुकांनी वेळ न घालवता अधिक माहितीसाठी सोलापूर GMC च्या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावा. एकंदरीत, जर तुम्ही सरकारी नोकरी करण्यास इच्छुक आहात आणि जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक तसेच वया संबंधित असणाऱ्या निकषांना पात्र ठरत आहात तर कसलाही वेळ न दवडता GMC च्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि तेथे जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा. कारण फक्त २० पदे आहेत आणि स्पर्धा अमाप आहे.






