फोटो सौजन्य - Social Media
RTE (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या पालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत ९ जानेवारी ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत शाळा नोंदणी व व्हेरिफिकेशन पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील विनाअनुदानित तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. यासंदर्भात राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आवश्यक परिपत्रक प्रसिद्ध केले असून, त्यानुसार शाळा नोंदणी आणि व्हेरिफिकेशनसाठी स्वतंत्र लिंक सुरू करण्यात आली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शाळा व्हेरिफिकेशन. शाळेने भरलेली माहिती अचूक आहे की नाही, शाळेची मान्यता कोणत्या मंडळाची आहे, तसेच नोंदणी करताना योग्य मंडळाची निवड करण्यात आली आहे का, याची तपासणी या टप्प्यात केली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या शाळेची मान्यता राज्य मंडळाची असताना नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले असल्यास, ती चूक तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, दिलेल्या कालावधीत म्हणजेच ९ ते १९ जानेवारी २०२६ या दरम्यान विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी नोंदणी व व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील आरटीई प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
प्राथमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार,






