फोन एक, रंग अनेक! Realme च्या 'या' स्मार्टफोनचा नवा कलर व्हेरिअंट लाँच, यूजर्स झाले खूष... पावरफुल बॅटरीसह मिळणार हे फीचर्स
Realme Narzo 90x 5G स्मार्टफोन कंपनीने नवीन मरून रेड कलर व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे आणि यासोबतच या डिव्हाईसमध्ये 60W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी देखील आहे. कंपनीच्या नव्या स्मार्टफोन व्हेरिअंटमध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा यूनिट आहे आणि या डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP65 रेटिंग आहे. नवीन कलर व्हेरिअंटची किंमत आणि याचे फीचर्स आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Realme )
Realme Narzo 90x 5G स्मार्टफोन नव्या मरून रेड कलर व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, याची माहिती अॅमेझॉन मायक्रोसाईटद्वारे देण्यात आली आहे. या नव्या व्हेरिअंटची विक्री 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. हा फोन अॅमेझॉन आणि रिअलमी इंडिया वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. डिसेंबरमध्ये फोन लाँच झाल्यापासून भारतात उपलब्ध असलेल्या फ्लॅश ब्लू आणि नायट्रो ब्लू शेड्समध्ये मरून रेड कलर व्हेरिअंटचा देखील समावेश झाला आहे. Realme Narzo 90x 5G च्या मरून रेड ऑप्शनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आणि 8GB रॅम +128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15,499 रुपये आहे.
Realme Narzo 90x 5G अँड्रॉईड 15 वर बेस्ड Realme UI 6.0 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.80-इंच (720×1,570 पिक्सेल) LCD स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या व्हेरिअंटमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 प्रोसेसर आहे, ज्याला 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह जोडण्यात आले आहे.
यामध्ये AI वाला 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा यूनिट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी, Realme Narzo 90x मध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. यामध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळावे यासाठी IP65 रेटिंग दिली आहे. हँडसेटमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि हे फेशियल रिकग्निशन फीचरला सपोर्ट करते. Realme Narzo 90x मध्ये 7,000mAh बॅटरी आहे, जी 60W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर यूजर्सना 61.3 तासांचा कॉलिंग टाइम मिळतो.






