BSNL Holi Special Offer: डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 164 दिवसांची व्हॅलिडीटी... स्पेशल ऑफरमध्ये मिळणार 'हे' फायदे
कंपनीने त्यांच्या एका जुन्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 997 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना आता जास्तीची 14 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. होळीनिमित्त सादर करण्यात आलेली ही एक लिमीटेड टाईम ऑफर आहे. या प्लॅनमध्ये दिर्घकाळ मिळणारी व्हॅलिडीटी यूजर्सना आकर्षित करत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI Created)
Rang barse… connection na tarse… This Holi, celebrations get a colourful upgrade with the special festive offer from BSNL — now with 14 Days EXTRA Validity. * ₹997
* 2GB Data Per Day
* Unlimited Calls
* 150 + 14 Days Validity
* Valid from 1st March till 31st March 2026… pic.twitter.com/oWIbNv3aJP — BSNL India (@BSNLCorporate) March 1, 2026
खरं तर बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये एक 997 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. डेटा संपल्यानंतर वेग कमी होऊ शकतो, परंतु इंटरनेटचा वापर सुरू राहील. एवढंच नाही तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. या फायद्यांमुळे हा प्लॅन अतिशय खास ठरत आहे.
हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना कंपनी 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करते. मात्र होळीनिमित्त सादर करण्यात आलेल्या स्पेशल ऑफरअंतर्गत कंपनी त्यांच्या यूजर्सना 14 दिवसांची जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, विशेष ऑफरअंतर्गत या प्लॅनमध्ये आता यूजर्सना 164 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. प्लॅनमध्ये दीर्घकाळ मिळणाऱ्या व्हॅलिडीटीमुळे, हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम पर्याय बनू शकतो ज्यांना वारंवार रिचार्ज टाळायचे आहेत.
कंपनीचं असं म्हणणं आहे की, ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे. ही ऑफर 1 मार्च ते 31 मार्च 2026 पर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत, तुम्हाला 997 रुपयांच्या रिचार्जवर 14 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडीटी मिळणार आहे. ऑफर संपल्यानंतर, प्लॅन त्याच्या 150 दिवसांच्या व्हॅलिडीटी ऑफरसह उपलब्ध राहील. टेलिकॉम कंपनीने त्यांच्या सोशल मीडियावर “रंगों का सेलिब्रेशन, नॉन-स्टॉप कनेक्शन” या टॅगलाइनसह या ऑफरचा प्रचार केला आहे. कंपनीने असेही नमूद केले आहे की लोक सणांच्या काळात अधिक कॉलिंग आणि डेटा वापरतात, म्हणून अतिरिक्त वैधता आणि अधिक डेटा यूजर्ससाठी खूप मदत करतो.






