फोटो सौजन्य - Social Media
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने भरतीला सुरुवात केली आहे. या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या भरतीसाठी एकूण रिक्त जागा ४२ आहेत. मुळात, १ फेब्रुवारी २०२५ रोजी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी Bank.sbi या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अर्ज २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करता येणार आहे. उमेदवारांना नियुक्तीला मिळवण्यासाठी काही टप्पे पात्र करणे आवश्यक आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. मुलाखतीची दिनांक अद्याप कळवण्यात आली नाही. लवकरच, याबद्दल सूचना देण्यात येईल.
मॅनेजर आणि Dy. Manager च्या पदासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना २४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना Rs. 750/- रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील सारखीच रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. महत्वाची बाब अशी आहे कि SC, ST and PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून कोणतीही रक्कम भरावी लागणार आहे. उमेदवारांना अगदी निशुल्क अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. मॅनेजरच्या पदासाठी किमान २६ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त वय ३६ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर Dy. Manager च्या पदासाठी किमान वय २४ निश्चित करण्यात आले आहे आणि कमाल वयोमर्यादा ३२ निश्चित करण्यात आली आहे. मॅनेजरच्या पदासाठी १३ जागा रिक्त आहेत. तर Dy. Manager च्या पदासाठी एकूण २९ जागा रिक्त आहेत. मॅनेजरच्या पदासाठी अर्ज करता उमेदवार B.E/ B.Tech किंवा संबंधित क्षेत्रात पदवीधर हवा, तर Dy. Manager च्या पदासाठी अर्ज करता उमेदवारासाठी देखील सारखी शिक्षण निकष निश्चित करण्यात आले आहे.
या भरतीच्या प्रक्रियेत ४ टप्प्यांचा समावेश आहे. या चारी टप्प्यांना पात्र करत उमेदवारांना या भरतीसाठी नियुक्त होणार आहे. पहिला टप्प्यात उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. तिसऱ्या टप्प्यात उमेदवारांना दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल. शेवटच्या टप्प्यात उमेदवारांना वैद्यकीय चाचणी पात्र करावी लागणार आहे.