फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल आणि एका प्रतिष्ठित बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल, तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी घेऊन आली आहे. बँकेने क्रेडिट ऑफिसर Central Bank of India Credit Officer Recruitment 2025, central bank of india credit officer direct link to apply, central bank of india recruitment 2025 salary, central bank of india recruitment 2025 application details, Central Bank of India credit officer recruitment, Government bank jobs,(Credit Officer) पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत एकूण 1000 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत centralbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
चला तर मग या भरतीशी संबंधित काही महत्वाच्या बाबी जाणून घेऊयात. या भरतीच्या माध्यमातून एकूण १००० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. क्रेडिट ऑफिसरच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली असून उमेदवारांना २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात अर्ज ऑनलाइन करता येणार आहे.
JMGS-I स्केलनुसार निवड झालेल्या उमेदवारांना ₹48,480 ते ₹85,920 दरम्यान मासिक वेतन दिले जाणार आहे. याशिवाय विविध बँकिंग भत्ते देखील मिळतील. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहे. वयोमर्यादा संदर्भात असणाऱ्या अटीनुसार, 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात काही प्रमाणात सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता अशी आहे कि अर्ज करता उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/OBC/PWBD साठी 55%) असणे आवश्यक आहे.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज शुल्क महिला तसेच SC/ST आणि PWBD उमेदवारांसाठी ₹१५० इतके आहे. तर इतर सर्व उमेदवारांसाठी ₹७५० निश्चित करण्यात आले आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज
उमेदवारांची निवड डिस्क्रिप्टिव टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. भरतीसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या centralbankofindia.co.in या संकेतस्थळाला भेट द्या. तसेच जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरातीचा संदर्भ घ्या आणि भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात करा.