फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात करिअरची निवड हा प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठा प्रश्न ठरतो. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर पुढे कोणता कोर्स करावा? कोणत्या क्षेत्रात चांगले भविष्य आहे? कोणत्या क्षेत्रात आर्थिक स्थैर्य आणि चांगली सैलरी मिळेल? अशा प्रश्नांनी विद्यार्थी आणि पालक दोघेही गोंधळून जातात. यावर उपाय म्हणून शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी एक खास मोबाईल App आणले आहे.
हे App म्हणजेच ‘My Career Advisor App’. हे एक AI (Artificial Intelligence) आधारित मोफत करिअर सल्लागार App असून विद्यार्थ्यांच्या कौशल्ये, आवडीनिवड आणि क्षमतांनुसार करिअरची दिशा दाखवते. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हे App लॉंच करण्यात आले आहे.
बर्याचदा विद्यार्थी चुकीच्या सल्ल्यामुळे आपली करिअर दिशा हरवतात. ‘My Career Advisor App’ मात्र विद्यार्थ्यांच्या आवडीनिवड आणि क्षमतांचा सखोल अभ्यास करून त्यांना योग्य कोर्स आणि करिअरची दिशा दाखवते. भविष्यात कोणत्या क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध आहेत, याबाबतची माहितीही या App द्वारे मिळू शकते. त्यामुळे करिअर निवडताना होणारा गोंधळ टाळता येतो.
विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी सरकारकडून हा मोठा उपक्रम आहे. मोफत उपलब्ध असलेल्या या अॅपमुळे करिअर निवडण्याचा ताण कमी होईल आणि योग्य करिअर निवडण्यासाठी दिशा मिळेल. म्हणूनच, करिअरबद्दल चिंता करण्याऐवजी ‘My Career Advisor App’ डाउनलोड करा आणि भविष्याचा मार्ग अधिक सोपा करा.