फोटो सौजन्य - Social Media
RITES लिमिटेडने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जनरल मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. एकूण १९ रिक्त जागांना भरण्यासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना rites.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे. २४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
उमेदवारांना अर्ज शुल्क करावे लागणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यासाठी रक्कमेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यासाठी ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. OBC आणि EWS प्रवर्गासाठी सारखीच रक्कम निश्चित करण्यात आली आहे. SC, ST तसेच PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ३०० रुपये अर्जब शुल्क भरायचे आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे.
उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र व्हावे लागणार आहे. हे पात्रता निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. जनरल मॅनेजरच्या पदासाठी किमान १८ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त ४९ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी किमान आयु १८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त ३२ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये चार टप्प्यांचा समावेश आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेला पात्र करावे लागणार आहे. अद्याप या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीसाठी उपस्तित राहावे लागणार आहे. दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. तर उमेदवारांना वैद्यकीय चाचणी पात्र करावी लागणार आहे.
एकूण १९ रिक्त जागांना भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. जनरल मॅनेजरच्या पदासाठी केवळ १ जागा रिक्त आहे. MBA/PGDBA/PGDBM/PGDHRM मध्ये पदवीधर असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी १८ जागा रिक्त आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असणारा उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.