फोटो सौजन्य -Social Media
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तसेच तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची दरवर्षी अनेक विद्यार्थी ग्रॅज्युएट अँटिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिन्ग (GATE) च्या परीक्षेस उपस्थित राहतात. दरवर्षी अनेक विष्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करत असतात. महत्वाची बाब म्हणजे यंदाच्या वर्षीही मोठ्या संख्येत उमेदवारांनी GATE 2025 साठी अर्ज केले आहे.
पण या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. उमेदवारांना २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येऊ शकते. अद्याप तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करू शकले नाही आहात तर भार घेण्याचे काहिच कारण नाही, आणखीन वेळ आहे. आजच्या आज या परीक्षेसाठी अर्ज करून टाका, अन्यथा वेळ निघून गेल्यास अतिरिक्त अर्ज शुल्क आकारले जाईल.
अतिरिक्त अर्ज शुल्क टाळण्यासाठी उमेदवारांनी gate2025.iitr.ac.in या लिंकवर जाऊन आपले अर्ज नोंदवावे. जर उमेदवारांनी आज अर्ज केले तर त्यांच्याकडून अतिरिक्त विलंन अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. आज अर्ज करण्याची मुदत जरी संपली असली तरी उमेदवारांना ७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. पण या वेळेमध्ये उमेदवारांकडून अतिरिक्त विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. उमेदवारांकडून त्याच्या आरक्षित प्रवर्गावरून अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. SC / ST तसेच PWD प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर सामान्य श्रेणीतील तसेच इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना १,८०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. महिला उमेदवारांनाही ९०० रुपयांचे भुगतान अर्ज शुल्क म्हणून करावे लागणार आहे.
GATE 2025 परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा १ फेब्रुवारी २०२५, २ फेब्रुवारी २०२५, १५ फेब्रुवारी २०२५ तसेच १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी साडे ९ ते दुपारी साडे १२ वाजेपर्यंत आहे. तर दुसरी शिफ्ट दुपारी २:३० ते सायंकाळी साडे ५ वाजेपर्यंत आहे.