फोटो सौजन्य - Social Media
कामाच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींसाठी एक खुशखबर आहे. जर तुम्ही रोजगाराच्या शोधामध्ये आहात तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. फूड डिलेव्हरी प्लॅटफॉर्म स्वीगीला काही उमेदवारांची गरज भासत आहे. त्यासाठी कंपनीने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जर तुम्ही सेल्स क्षेत्रातील आहात आणि नोकरीच्या शोधात आहात तर तुम्ही नक्कीच या भारती प्रक्रियेचा लाभ घेतला पाहिजे. या संदर्भात स्वीगीने जाहिरात जाहीर केली आहे. तसेच इच्छुक असलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग होण्यासाठी अर्ज करण्यास आवाहन केले आहे. मुळात, या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराला इ कॉमर्स क्षेत्रातील तगडे ज्ञान असणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा : कॅबिनेट सचिवालयामध्ये DFO पदाची जागा रिक्त; १६० रिक्त जागांसाठी आयोजित भरती प्रक्रिया
या भरतीमधून नियुक्त होणाऱ्या उमेदवाराच्या खांदयावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या जातील. एकंदरीत, सेल्स मॅनेजर पदासाठी निवडीत उमेदवाराला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. या जबाबदाऱ्यांमध्ये रेस्टोरंट सोबत कॉन्ट्रॅक्ट साइन करणे, नव्या ग्राहकांसोबत इन्क्वायरी हॅन्डल करणे, रेस्टोरंटच्या मालकांशी चांगले संबंध ठेवणे तसेच त्यानं वेळोवेळी मार्केटविषयी सल्ला देणे, सेल्स एडमिनिस्ट्रेशन तसेच ऑपरेशनल परफॉरमेंस या गोष्टींना हाताळणे, बिझनेस प्लान सुचवणे, कंपनीच्या ध्येयांना पूर्ण करण्यात मोलाचे योगदान देणे तसेच बाजारात स्वीगीची ओळख प्रस्थापित करण्याचा समावेश आहे. या जबाबदाऱ्या सेल्स मॅनेजर पदी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला पार पाडाव्या लागतील.
सेल्स मॅनेजर पदी अर्ज करण्यासाठी काही शैक्षणिक अटींना पात्र करणे गरजेचे आहे. या पदासाठी अर्ज कर्ता उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज कर्ता उमेदवाराला सेल्स डोमेनमध्ये किमान १ ते २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराकडे प्रभावी संवाद करणे, सहकार्य करणे, लीडरशिप, पुढाकार घेणे तसेच सर्जनशीलता असे कौशल्य असणे फार आवश्यक आहे. काही सुंत्रानुसार, या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला ३.५ लाख ते ११ लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज दिले जाईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दिल्ली येथे काम करण्याची संधी दिली जाईल. इच्छुक उमेदवारांनी या भरती विधायि अधिक माहितीसाठी स्वीगीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.