फोटो सौजन्य - Social Media
भारताच्या कॅबिनेट सचिवालयामध्ये DFO पदासाठी भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. डेप्युटी फिल्ड ऑफिसरच्या पदासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली गेली असून, या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून DFO पदासाठी रिक्त असणाऱ्या एकूण १६० जगण्याची भरती केली जाणार आहे. या संदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे`. भारताच्या कॅबिनेट सचिवालयाने जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेच्या आधारे लिखित या लेखामध्ये या भरती प्रक्रिये संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे. कॅबिनेट सचिवालयातील तांत्रिक पदांना भरणे हे या भरती प्रक्रिया आयोजित करण्यामागचा हेतू आहे. या भरतीच्या मार्फत नियुक्त होणारे उमेदवार राष्ट्रीय सुरक्षा तसेच कॅबिनेट सचिवालयाच्या कामांमध्ये योगदान करण्यास सक्षम बनवते.
हे देखील वाचा : RRBची बंपर भरती; ११,५५८ रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु, त्वरित करा अर्ज
कॅबिनेट सचिवालयाद्वारे आयोजित असलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये डेप्युटी फिल्ड ऑफिसरच्या रिक्त पदांचा विचार केला जात आहे. यासाठी तांत्रिक विभागात तरबेज असलेल्या उमेदवारांना आमंत्रित केले गेले आहे. तांत्रिक विभागातील DFO या पदासाठी नियुक्त केले जाणाऱ्या उमेदवारांना ९५,००० रुपये दरमाह वेतनमान दिला जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही अटी शर्तींचा आढावा घ्यावा लागणार आहे.
या भरतीसंबंधित जाहीर केले गेलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये अर्ज करण्यास पात्र असणाऱ्या अटी शर्ती नमूद आहेत. या अटीशर्ती शैक्षणिक आहेत, त्याचबरोबर उमेदवारांच्या आयु संदर्भात आहेत. अर्ज करण्यास इच्छुक असणारा उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून B.Tech मध्ये पदवीधर असावा किंवा उमेदवाराकडे M.Sc मध्ये मास्टर डिग्री असावी. तसेच उमेदवाराने २०२२, २०२३ तसेच २०२४ पैकी कोणत्याही एका शैक्षणिक वर्षांमध्ये GATE ची परीक्षा उत्तीर्ण केली असावी. त्याचबरोबर, अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असावे तर कमाल वय ३० वर्षे इतकी असावी. एकंदरीत, १८ वर्षे ते ३० वर्षे वयोगटातील उमेदवारांना या भरतीमध्ये सहभाग घेता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये काही प्रमाणात सूट दिली जाईल. एससी/एसटी प्रवगातील उमेदवारांना अधिक ५ वर्षांपर्यंतची सूट तर ओबीसी उमेदवारांना अधिक ३ वर्षांपर्यंतची सूट दिली जाईल.
हे देखील वाचा : भारतीय स्टेट बँकेत १,५११ पदांसाठी भरती सुरु; आजपासून करता येणार अर्ज
अर्ज करण्यास पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा. त्याला काळजीपूर्वक भरून घ्या, तसेच आवश्यक ते सर्व दस्तऐवज त्याला जोडून घ्या. अर्ज साधारण पोस्टाच्या माध्यमातून ‘पोस्ट बॅग क्रमांक 001, लोधी रोड हेड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली-११०००३’, या पत्त्यावर पाठवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२४ आहे.