फोटो सौजन्य - Social Media
बारावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रात उत्तम करिअर घडवण्याचा विचार करत आहात? पण Btech मध्ये असणाऱ्या अनेक पर्यायांमुळे गोंधळला आहात? तर शांत राहा आणि विचार करा की कशामध्ये तुम्हाला रस आहे आणि कशामध्ये खरंच उज्वल भविष्य आहे? या दोन गोष्टींचा विचार करणे महत्वाचे आहे तरीही एक आधार म्हणून हा लेख संपूर्ण वाचा.
बी.टेक मध्ये अनेक ब्रांचेस आहेत. त्यामध्ये कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि मैकेनिकल इंजीनियरिंग यांचा समावेश आहे. कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंगसाठी IIT Bombay, IIT Delhi, IIIT Hyderabad हे टॉप कॉलेज मानले जातात. Google, Amazon, Microsoft सारख्या कंपनीत लागून 27.6 लाख/वर्ष कमवण्याची इच्छा असेल तर कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग एक चांगला पर्याय आहे. इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन करायचे असेल तर IIT Delhi, NIT Trichy हे टॉप कॉलेज आहेत. हे कोर्स केल्यास Qualcomm, Intel, Samsung सारख्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळते आणि 20.5 लाख/वर्ष पॅकेज मिळतो.
इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग कोर्स केल्यास NTPC, Siemens, BHEL मध्ये नोकरी मिळते. अंदाजे 18.6 लाख/वर्ष पगार यातून मिळेल. IIT Kanpur, IIT Roorkee हे बेस्ट कॉलेज आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीसाठी IIIT Hyderabad, NIT Surathkal कॉलेज उत्तम मानले जातात. IBM, Flipkart, TCS Digital मध्ये नोकरी मिळवून किमान 20.1 लाख/वर्ष कमवण्याचे ध्येय असेल तर नक्कीच IT उत्तम पर्याय आहे.
जर तुम्ही 2025 मध्ये बीटेक (BTech) करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला चांगले प्लेसमेंट आणि उच्च पगार देणारी शाखा (ब्रँच) निवडणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला हे पाहावे लागेल की कोणत्या बीटेक शाखेला जागतिक स्तरावर जास्त मागणी आहे. योग्य शाखेसोबतच जर शिक्षण सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून जसे की IITs किंवा NITs होत असेल, तर तुमच्या नोकरीच्या संधी अधिकच उजळतात.