File Photo : Fraud
नागपूर : बँक खात्यातून 20 कोटी रुपयांचा गैरकायदेशीर व्यवहार झाल्याची बतावणी करून तोतया सायबर पोलिसाने एका व्यक्तीला 13.16 लाख रुपयांचा चुना लावला. या प्रकरणी सदर पोलिसांनी एनॉन मथ्थुशील प्यारेजी (वय 39, रा. न्यू कॉलनी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
हेदेखील वाचा : दहावीच्या विद्यार्थिनीला अॅसिड फेकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी; पोलिसांत तक्रार येताच…
एनॉन हे पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात आणि आईसोबत न्यू कॉलनीत राहतात. गेल्या 18 ऑगस्टच्या सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास त्यांना व्हॉट्सऍपवर ऑडिओ कॉल आला. फोन करणाऱ्याने सायबर गुन्हे विभागाचा अधिकारी त्यानंतर आरोपीने त्यांना स्काईप ऍप, योनो एसबीआय ऍप आणि योनो लाईट ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांचे पासवर्ड एनॉन यांच्या लक्षात नव्हते.
आरोपीने त्यांना एक पासवर्ड दिला. तो पासवर्ड टाकताच लॉग-ईन झाले. आरोपीने 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान एनॉन यांच्याकडून ओटीपी घेत 16 ट्रांजेक्शन केले. इतकेच नाही तर त्यांच्या आईचे एफडी खाते तोडून 13.16 लाख रुपयेही स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले. फसवणूक झाल्याचे समजताच एनॉन यांनी सदर पोलिसात तक्रार केली.
तुमच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून 20 कोटी रुपयांचा गैरकायदेशीर व्यवहार झाला आहे. या प्रकरणाची गोपनिय चौकशी सायबर गुन्हे विभाग, मुंबईकडून केली जात आहे. या प्रकरणात तुम्हाला अटक होऊन तुरुंगात जावे लागेल, अशी थाप मारली. स्थानिक पोलिसांना सांगितल्यास प्रकरण आणखी चिघळण्याची भीती दाखवली. सर्व प्रकरण तो त्याच्या स्तरावरच निपटवून देईल. कसेही करून 50 हजार रुपयांची व्यवस्था करण्यास आरोपीने सांगितले.
हेदेखील वाचा : Good News ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवी पेन्शन योजना