फोटो सौजन्य-ट्विटर
नागपूर : राज्यात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. कठोर कारवाई करुन देखील काही नराधमांना पोलिसांचा धाकच उरलेला दिसत नाही. नागपूरमध्ये अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एक-दोन नव्हे तर तब्बल 17 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.
हेदेखील वाचा : Anjali Damania on Devendra Fadanvis: हीच देवेंद्र फडणवीसांची रणनीती…; अंजली दमानियांचा गंभीर आरोप
नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याअंतर्गत एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने एका खासगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या परिसरात ही खासगी नामांकित शाळा आहे. शाळेजवळ स्टेशनरीचे दुकान आहे. एक चिमुरडी शाळकरी मुलगी स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला.
रवी लाखे (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी रवी हा शटर दुरुस्ती करण्याचे काम करतो. स्टेशनरी दुकानात लावलेले शटर खराब झाल्याने रवी दुकानात आला होता. केवळ २ तासांत आरोपीने स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या सुमारे 17 चिमुकल्या मुलींशी अश्लील कृत्य करुन विनयभंग केला.
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल
कारेगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेतील काही अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य करत मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अनिल महादेव शेळके या शिक्षकावर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
राज्यात वाढत आहेत गुन्हेगारीच्या घटना
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला.
हेदेखील वाचा : UP Crime News: ’86 वर्षांच्या आजी विनवणी करत होत्या पण…,’ दारूच्या नशेत 24 वर्षीय तरुणाने केला लैंगिक अत्याचार