मीरा-भाईंदरमध्ये गोमांस तस्करीच्या विरोधात घोषणाबाजी
मुंबई : सध्या मुंबईमध्ये (Mumbai) अनेक घडामोडी घडत आहेत. वसईमध्ये दिवसा एकतर्फी प्रेमामुळे तरुणीची आत्महत्या करण्यात आली आहे. तर काही दिवसापूर्वीच मीरा-भाईंदरमध्ये (Mira Bhayandar) बॉम्बने उडवण्याची धमकी एका तरुणाने दिली होती. या घटनांमुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मीरा भाईंदरमधील सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली आहे की, गोमांस तस्करीच्या प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गोमांस तस्करीला राज्यामध्ये त्याचबरोबर देशामध्ये बंदी आहे. गोमांस तस्करीच्या प्रकरणामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही घटना समजताच हिंदू बांधवानी धार्मिक घोषणाबाजी सुरु केली आहे. त्यामुळे संपूर्ण नयानगर दुमदुमले आहे.
गोमांस तस्करी प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून 4 टेम्पोसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान आमदार गीता जैन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, मीरा-भाईंदर शहरामध्ये जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे, काही लोक खिसे भरण्यासाठी घृणास्पद गोष्टी करत आहेत. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी पुढे येऊन शहर उध्वस्त करू नका, हे लोकांना समजावून सांगावे लागेल. स्थानिक मुस्लिम बांधवांचाही गोमांस तस्करीला विरोध आहे, अशा परिस्थितीत उर्वरित आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी उपायुक्त एम.बी.व्ही.व्ही प्रकाश गायकवाड म्हणाले की, पोलिसांवर विश्वास ठेवा, कायदा निःपक्षपातीपणे काम करतो. आम्ही कारवाई करून ४ गाड्या आणि ३ जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे त्यांनी सांगितले आहे.